‘सुंदरी’ला सासरच्यांकडून मिळाला बाप्पाची स्थापना करण्याचा अधिकार | पुढारी

‘सुंदरी’ला सासरच्यांकडून मिळाला बाप्पाची स्थापना करण्याचा अधिकार

पुढारी ऑनलाईन डेस्क : सन मराठीच्या ‘सुंदरी’ मालिकेत ‘सुंदरी’ला सासरच्यांकडून मिळाला बाप्पाची स्थापना करण्याचा अधिकार मिळालाय. गणेशोत्सवाच्या निमित्ताने हा खास प्रसंग प्रेक्षकांना पाहता येणार आहे.

सध्या सर्वत्र आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रत्येकासाठी गणेशोत्सव हा खूप खास असतो, मग ती व्यक्ती लहान असो किंवा वयस्कर, मुलगा असो किंवा मुलगी, माहेरचा गणपती असो किंवा सासरचा, आनंद तोच असतो.

विशेष म्हणजे, बाप्पा आणतात आणि जेव्हा स्थापना केली जाते तेव्हा कित्येक मुलींना असं वाटत असतं की बाप्पाची स्थापना त्यांच्या हस्ते व्हावी, पण अजूनही समाजात काही ठिकाणी पुरुषांनीच स्थापना करावी असा समज आहे. काही प्रगतीशील शहरांत मात्र मुलींना हा अधिकार देखील देण्यात आलेला आहे, त्यामुळे मुलींचा आनंद गगनात मावेना असा असतो. पण आनंद आणि समाधान तेव्हा द्विगुणित होतो जेव्हा मुलीला तिच्या सासरच्या मंडळींकडून सुध्दा सांगण्यात येतं की, “बाप्पाची स्थापना तू कर”. हाच नाजूक विषय ‘सुंदरी’ या मालिकेत अतिशय सुंदर पध्दतीने हाताळला आहे.

Back to top button