Disha Patani : मुकेश अंबानीच्या गणेश उत्सावाला दिशाने अशी साडी नेसली की... | पुढारी

Disha Patani : मुकेश अंबानीच्या गणेश उत्सावाला दिशाने अशी साडी नेसली की...

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटानी ( Disha Patani ) तिच्या अभिनयासोबत स्टायलिश अंदाजमुळे नेहमीच चर्चेत असते. प्रसिद्ध उद्द्योगपती मुकेश अंबानी याच्या घरी गणपती बाप्पाचे आगमनानिमित्ताने ठेवलेल्या पार्टीत सध्या दिशा पोहोचली आहे. परंतु, यावेळी परिधान केलेल्या वेशभूषेमुळे ती चांगलीच ट्रोल झाली आहे. या पार्टीला बॉलिवूड अभिनेत्री सलमान खानपासून ते ऐश्वर्या रायपर्यत अनेक स्टार्सनी हजेरी लावली.

संबधित बातम्या

उद्द्योगपती मुकेश अंबानी यांनी त्याच्या घरी (अँटिलिया ) गणेश उत्वासानिमित्ताने काल संध्याकाळी एका खास पार्टीचे आयोजन केलं होतं. या पार्टीला बॉलिवूड अभिनेता सलमान खान, शाहरुख खान, वरुण धवन, दीपिका पादुकोण, नयनतारा, करिश्मा कपूर, आराध्यासोबत ऐश्वर्या राय, नव्या नंदा, रेखा, अगस्त्या नंदा यांच्यासह अनेक दिग्गज स्टार्संनी हजेरी लावली. मात्र, बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटानीने ( Disha Patani ) घातलेल्या कपड्यामुळे ती प्रकाश झोतात आली आहे.

या पार्टीत दिशाने एका सिल्क स्पीच रंगाच्या साडीवर स्टायलिश ब्रालेट ब्लॉऊज परिधान केलं आहे. दिशाचा हा लूक खूपच स्टायलिश दिसला. यावेळी खास करून दिशा नेहमीप्रमाणे साडीवर कर्वी फिगर प्लॉन्ट करताना दिसली. या पार्टीत दिशा आणि मौनी रॉयने पॉपाराझीच्या कॅमेऱ्याला एकापेक्षा एक हॉट पोझ दिल्या. मोकळे केस आणि मेकअपने दिशाने तिचा लूक पूर्ण केला. दिशाचा हा व्हिडिओ विरल भयानी इन्स्टाग्राम अंकाऊटवर व्हायरल झाला आहे.

हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच काही युजर्सनी दिशाच्या लूकचे भरभरून कौतुक केलं आहे. तर काही नेटकऱ्यांनी दिशाला चांगलेच धारेवर धरत ट्रोल केलं आहे. ‘दिशाने गणेश उत्सवात नीटकेटके कपडे घालायला हवे होते’, ‘असे कपडे घालून अंगप्रदर्शन करायचे आहे काय?’, ‘कसे वागायचे समजत नाही काय?’, ‘जरा तरी आपण कोठे आहे याचे भान ठेवा’. यासारख्या अने कॉमेन्टस नेटकऱ्यांनी केलं आहे. या व्हिडिओला ६७ हजारांहून अधिक जणांनी लाईक्स केलं आहे.

हेही वाचा : 

(video : viralbhayani instagram वरून साभार)

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

Back to top button