Priyanka Chopra : देसी गर्लचे संस्कार! छोटा बाप्पा अन् मालतीचा ‘तो’ निरागस फोटो व्हायरल

Priyanka Chopra : देसी गर्लचे संस्कार! छोटा बाप्पा अन् मालतीचा ‘तो’ निरागस फोटो व्हायरल

पुढारी ऑनलाईन डेस्क : गणेश चतुर्थीमुळे सध्या देशभरात उत्साहाचे वातावरण आहे. प्रत्येक जण मोठ्या थाटामाटात गणेश उत्सव साजरा करत आहेत. देसी गर्ल अभिनेत्री प्रियांका चोप्रानेही (Priyanka Chopra) आपली लाडकी लेक मालतीसोबत गणेश चतुर्थी साजरी केली. तिने आपल्या लाडक्या लेकीसोबतचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. (Priyanka Chopra)

प्रियांका सध्या परदेशात वास्तव्यास आहे. पण ती कोणताही सण साजरा करायला विसरत नाही. लेक मालती मेरीसोबत ती प्रत्येक सणाचा आनंद घेत असते. कापसापासून बनवलेल्या छोट्या गणपतीसोबत खेळत असणाऱ्या आपल्या लेकीचे सुंदर फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये मालती गणपती बाप्पाला मिठी मारताना दिसतेय.

हातात बांगड्या, डोक्यावर बिंदी व पारंपरिक ड्रेसमध्ये प्रियांकाने मालतीचा लूक तयार केला आहे. या ड्रेसमध्ये ती खूपच गोड दिसत आहे. तसेच आपल्या गोंडस बाप्पाला मिठी मारताना व बाप्पासोबत खेळताना मालती हरवून गेलेली दिसते. हे फोटो शेअर करताना प्रियांकाने लिहिले की, एक मुलगी आणि तिचा गणपती … ती कोठेही गेली तरी तिचा बाप्पा तिच्यासोबत असतोच…प्रियांका दररोज मालतीसोबतचे फोटो व व्हिडिओ शेअर करीत असते. तिच्या या फोटोंना पसंती मिळत आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news