Ganesh Utsav In Marathi Serials : या आठवड्यात मराठी मालिकांमध्ये गणेशोत्सवाची धूम! | पुढारी

Ganesh Utsav In Marathi Serials : या आठवड्यात मराठी मालिकांमध्ये गणेशोत्सवाची धूम!

पुढारी ऑनलाईन डेस्क : गणपती बाप्पाचे आगमन मोठ्या जल्लोषात झाले आहे. (Ganesh Utsav In Marathi Serials) गणेश चतुर्थी निमित्ताने जवळ जवळ सगळ्याच मालिकेत आपले लाडके बाप्पा दिसतील आणि मालिकेत काय नवीन वळण येणार हे तुम्हाला ह्या आठवड्यात दिसून येईल. (Ganesh Utsav In Marathi Serials)

अर्जुनची कोर्ट सुनावणी असल्याने त्याला ‘आजच शिक्षा होणार का?’ असा प्रश्न पडतो. त्याला घर व घरातल्या लोकांना सोडून जावं लागेल, ह्याची जाणीव होते. कोर्टात जाताना आप्पी त्याला विश्वास देते की, काहीही झालं तरी ती त्याच्यासोबत आहे. अर्जुन प्रेमाने अप्पीला हरतालिकेचा उपवास सोडण्यासाठी डब्बा पाठवतो आणि सोबत चिट्ठी पाठवतो. त्या चिट्ठीत अर्जुन आपल्या भावना व्यक्त करतो. आता बाप्पाचा आशीर्वादाने अर्जुन वरच हे संकट होईल?

‘सारं काही तिच्यासाठी’ मालिकेत खोतांच्या घरातदेखील गणेश आगमनाची तयारी सुरु आहे. रघुनाथ खोत स्वतः मातीचा गणपती तयार करुन त्याची प्राणप्रतिष्ठा करणार आहे. तर खोतांच्या घरात गौरी आणण्याचा मान यावेळी ओवीला मिळणार आहे.

‘तू चाल पुढं’मध्ये अश्विनीची वार्षिक परीक्षा आहे आणि घरात गणपतीची तयारी पण सुरु आहे. तिची सगळी धावपळ होत आहे. दर वर्षी प्रमाणे तिने मोदक बनवण्याची ऑर्डरदेखील घेतली आहे. या सर्व जवाबदाऱ्या अश्विनी विघ्नहर्त्याच्या साक्षीने पार पाडताना आपण पाहाल. ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ मालिकेत अधिपती आणि अक्षराच्या घरी सुद्धा गणपती बाप्पाचे आगमन होणार आहे.

‘नवा गडी नवं राज्य’मध्ये कर्णिकांच्या घर गणपती विराजमान होणार असून सगळ्यांची धांदल उडाली आहे. आनंदीची गणपतीच्या मूर्तीची ऑर्डर पूर्ण करण्याची घाई आहे. यातच तिच्या हाताला जखम होते आणि पूर्ण कुटुंब तिच्या मदतीला धावून येतं. ‘३६ गुणी जोडी’ या मालिकेत वानखेडेंच्या घरात जल्लोषात गणेश चतुर्थी साजरी होणार असून अमुल्या आणि वेदांताचे कुटुंब जवळ येणार आहे.

Back to top button