Vada Pav Recipe : स्ट्रीट स्टाईल बॉम्बे वडा रेसिपी, शिल्पा-नुसरतनेही मारलाय ताव | पुढारी

Vada Pav Recipe : स्ट्रीट स्टाईल बॉम्बे वडा रेसिपी, शिल्पा-नुसरतनेही मारलाय ताव

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड अभिनेत्री नुसरत भरुचा, शिल्पा शेट्टी यांनी ही मुंबईच्या रस्त्यावर उतरून वडापावची चव चाखलीय. वडा पावच्या टेस्टी सुगंधानेच या अभिनेत्रींना वडापाव खाण्याचा मोह आवरता आलेला नाही. (Vada Pav Recipe) आपण या अभिनेत्रींचे व्हिडिओपण सोशल मीडियावर पाहू शकतो. (Vada Pav Recipe) काही महिन्यांपूर्वी बॉलीवूडची धकधक गर्ल अभिनेत्री माधुरी दीक्षितनेही वडा पाव खाल्ला होता. मुंबईचा फेमस स्ट्रीट फूड वडा पाव इतका प्रसिद्ध आहे की, अनेक बॉलिवूड दिवा अभिनेत्रींनी चक्क रस्त्यावर उभारून वडा पाववर ताव मारलाय.

नुसरत भरुचाचा वडापाव खातानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यामध्येही ती वडापाव वर ताव मारताना दिसते. शिल्पा शेट्टीने तर चारचाकी गाडीतून मुंबईच्या स्ट्रीट फूडचा पेरफटका मारत गरमागरम वडापाववर ताव मारला होता. जाणून गेऊया परफेक्ट स्ट्रीट स्टाईल वडा पाव कसा बनवायचा.

संबंधित बातम्या

No Image

Recipe By स्वालिया शिकलगार

Course: नाश्ता Cusine: भारतीय Difficulty: : सोपे

Servings

१० minutes

Preparing Time

२० minutes

Cooking Time

२० minutes

Calories

kcal

INGREDIENTS

 1. बेसन पीठ

 2. हळद

 3. मीठ

 4. गरम तेल

 5. पाणी

 6. हिरव्या मिरच्या

 7. कोथिंबीर

 8. आले

 9. लसुण

 10. बेकिंग सोडा

 11. मोहरी

 12. जिरे

 13. लाल तिखट

 14. उकडलेले बटाटे

 15. तांदळाचे पीठ

 16. हिंग

 17. कडीपत्ता

DIRECTION

 1. प्रथम बेसन पीठ चाळणीने चाळून घ्या

 2. त्यात तांदळाचे पीठ मिक्स कार

 3. वरून मीठ, हळद, लाल तिखट आणि पाणी घालून मिक्स करा

 4. पुढे बेकिंग सोडा आणि गरम तेल घालून सर्व मिश्रण एकजीव करा

 5. आता दुसरीकडे उकडलेले बटाटे स्मॅश करून घ्या

 6. मिक्सरमध्ये आले, लसुण, कोथिंबीर, हिरव्या मिरच्यांची पेस्ट करून घ्या

 7. उकडलेल्या बटाटामध्ये ही पेस्ट घालून एकजीव करून मसाला तयार करून घ्या

 8. आता एका मोठी कढई गॅसवर तापवायला ठेवा

 9. तेल कडक करून घ्या

 10. बटाट्याचा मसाला हाताने घेऊन हव्या तेवढ्या आकाराचे चपटे गोळे करून घ्या

 11. आता बेसनपीठाच्या मिश्रणात एक एक गोळा बुडवून तेलात सोडा

 12. वडे दोन्ही बाजूंनी चांगले तळून घ्या

 13. पावभाजीचा पाव घेऊन मधून कट करा

 14. त्यात पुदिना चटणी किंवा शेंगदाणा चटणी लावून वडा पावामध्ये ठेवून द्या

 15. तळलेल्या हिरव्या मिरच्यांसबोतही तुम्ही हा वडा खाऊ शकता

NOTES

  bollycelebrities_ insta वरून साभार व्हिडिओ

  Back to top button