Big Movies Clash : Singham Again-Pushpa 2 बद्दल मोठी अपडेट समोर

singham again -Pushpa 2
singham again -Pushpa 2

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड अभिनेता अजय देवगणचा सिंघम अगेन आणि साऊथ अभिनेता अल्लू अर्जुनचा पुष्पा २ एकाच दिवशी ( Singham Again-Pushpa 2) प्रदर्शित होणार असल्याचे वृत्त समोर आले आहे. सोबतच इंडियन २ हा चित्रपटदेखील त्याचदिवशी प्रदर्शित होणार असल्याचं म्हटलं जात आहे. ट्विटरवरून याबाबतची माहिती देण्यात आलीय. ( Singham Again-Pushpa 2)
पुष्पा २ द रूल ची प्रतीक्षा करणाऱ्या प्रेक्षकांसाठी चांगली बातमी आहे. पुष्पा २ रिलीज डेटची घोषणा झालीय. अल्लू अर्जुनने इंट्रेस्टिंग पोस्टरसोबत पुष्पा 2 ची माहिती दिलीय. २०२४ मध्ये १५ ऑगस्ट रोजी हा चित्रपट प्रदर्शित होईल. सोबतच अजय देवगणचा चित्रपट सिंघम अगेन सीक्वल प्रदर्शित होईल. सोबतच कमल हासन यांचा इंडियन २ देखील स्वातंत्र्य दिनी प्रदर्शित होणार अशल्याचे कळते. पण, याबद्दलची पुष्टी अद्याप झालेली नाही.

पोस्टरने वेधले लक्ष

अल्लू अर्जुनने ट्विट केले आहे. त्यात म्हटले आहे-१५ ऑगस्ट २०२४ रोजी #पुष्पा२ द रुल. एक पोस्टर देखील त्याने शेअर केले आहे. ज्यामध्ये अल्लू अर्जुनचा हात सोन्याच्या बांगड्या आणि अंगठ्याने सजलेला दिसतो आहे. लाल नेल पेंट सर्वात लहान बोटावर दिसतो आणि बोटांवर रक्ताचे डागदेखील देखील दिसत आहेत.

बॉक्स ऑफिसवर तगडी स्पर्धा

अजय देवगण आणि रोहित शेट्टी सिंघम अगेन घेऊन येताहेत. या चित्रपटाची तारीख देखील १५ ऑगस्ट २०२४ ठेवण्यात आलीय. मोठ्या पडद्यावर एकाच दिवशी दोन चित्रपटांमध्ये क्लॅश पाहाय़ला मिळेल.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news