Gautami Patil : वडील गेल्याचे दु:ख आहे की नाही? गौतमीला नेटकऱ्यांनी सुनावलं | पुढारी

Gautami Patil : वडील गेल्याचे दु:ख आहे की नाही? गौतमीला नेटकऱ्यांनी सुनावलं

पुढारी ऑनलाईन डेस्क : प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील हिने ठाण्‍यातील टेंभी नाका येथील दहीहंडीनिमित्त आयाोजित कार्यक्रमात हजेरी लावली. (Gautami Patil ) यावेळी तिने आपल्या अदाकारीने सर्वांना ठेका धरायला लावले. सरकार तुम्ही केलंय मार्केट जाम या गाण्यावर तिचा डान्स सुरु होताच तरुणाईने ताल धरला आणि एकच जल्लोष झाला. पण, दुसरीकडे गौतमीला प्रचंड ट्रोल केलं जात आहे. कारण , तिच्या वडिलांचे चार दिवसांपूर्वीच निधन झाले होते (Gautami Patil ) आणि दहीहंडी उत्सवात तिने डान्स केला. पण काही नेटकऱ्यांनी तिची बाजू घेत तिला समर्थन दिले. दहीहंडी उत्सवाला लावणीची सुपारी काही महिने आधी घेतल्याचे नेटकऱ्यांनी सांगितले. त्यामुळे ऐनवेळेला सुपारी रद्द करता आली नसती किंवा पैसे परत देता येत नाहीत, असा सूर तिचे समर्थन करणाऱ्या नेटकऱ्यांमधून होता.

गौतमीचे वडील काही दिवसांपूर्वी धुळे येथे बेवारस अवस्‍थेत सापडले होते. पुण्यातील बिबवेवाडी भागातील एका खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. चार दिवसांपूर्वी उपचार सुरु असताना त्यांचा मृत्यू झाला होता. गौतमीचे आई आणि वडील काही वर्षांपासून विभक्‍त राहत होते. गौतमी तिच्या आईसोबत राहते.

दरम्यान, दहीहंडीच्या कार्यक्रमाची सुपारी घेऊन दहीहंडी उत्सवाला तिने बेधडक हजेरी लावली. त्यामुळे चार दिवसांपूर्वी झालेल्या तिच्या वडिलांचा निधनाच्या बातमीचा सूर लावत अनेकांनी तिच्यावर टीका केलीय. सोशल मीडियावर तिचे या दहीहंडी उत्सवातील व्हिडिओ व्हायरल होत आहेत. या व्हिडिओवर अनेक नेटकऱ्यांनी टीका करत तिच्यावर कॉमेंट्स करायला सुरुवात केली. नेटकऱ्यांनी म्हटंलय- गौतमी पाटील बेधडक नाचली…चार दिवसांपूर्वीच वडिलांचा मृत्यू झालाय अन् ही बाई… आणखी एकाने म्हटलंय- वडील गेल्याचे दु:ख आहे की नाही?

गौतमीचे वडील रवींद्र पाटील यांचे काही दिवसांपूर्वीच निधन झाले आहे. बेवारस अवस्थेत ते आढळून आले होते. त्यानंतर त्यांना उपचारासाठी पुण्यातील बिबवेवाडी परिसरातील एका रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. परंतु उपचार सुरू असतानाच त्यांनी अखेरचा श्वास घेतला होता.

 

Back to top button