Jailer Actor Marimuthu : ‘जेलर’ फेम अभिनेते मारीमुथु यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन | पुढारी

Jailer Actor Marimuthu : ‘जेलर’ फेम अभिनेते मारीमुथु यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन

पुढारी ऑनलाईन डेस्क : ब्लॉकबस्टर चित्रपट ‘जेलर’अभिनेते जी मारीमुथु यांचे हृदयविकाराचा झटक्याने निधन झाले. ते ५७ वर्षांचे होते. त्यांच्या निधनाने तमिळ इंडस्ट्रीत शोककळा पसरली आहे. (Jailer Actor Marimuthu) जी मारीमुथु यांना रजनीकांत यांचा ब्लॉकबस्टर चित्रपट ‘जेलर’मध्ये पाहण्यात आलं होतं. चित्रपट ट्रेड ॲनालिस्ट रमेश बाला यांनी शुक्रवारी एक्स (ट्विटर) वर अभिनेत्याच्या निधनाच्या वृत्ताची पुष्टी केली. (Jailer Actor Marimuthu )

जी मारीमथु यांनी तमिळ टीव्ही कार्यक्रमांमध्ये अभिनय केला होता. एथिरनीचलच्या भूमिकेतून त्यांना प्रचंड लोकप्रियता मिळाली होती. त्यांनी चित्रपट निर्माते मणिरत्नमसह अन्य लोकांसोबत असिस्टेंट डायरेक्टर म्हणून काम केलं होतं.

रमेश बाला यांनी ट्विट करत म्हटले आहे की-“धक्कादायक, तमिळ दिग्दर्शक मारीमुथु यांचे आज सकाळी कार्डियक अरेस्टमुळे निधन झाले. टीवी मालिकेती संवादामुळे त्यांचे फॅन फॉलोइंग वाढले…परमेश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो!” एका अन्य ट्विटमध्ये ते म्हणाले, “ते ५७ वर्षांचे होते…”

Back to top button