Housefull 5: यूकेमध्ये होणार 'हाऊसफुल ५' चे शूटिंग, नवं अपडेट समोर | पुढारी

Housefull 5: यूकेमध्ये होणार 'हाऊसफुल ५' चे शूटिंग, नवं अपडेट समोर

पुढारी ऑनलाईन डेस्क : ‘हाउसफुल’ फ्रेंचायजीच्या पाचव्या चित्रपटाची घोषणा निर्मात्यांनी केली आहे. (Housefull 5) ‘हाऊसफुल ५’ पुढील वर्षी दिवाळीच्या औचित्याने रिलीज होणार आहे. यामध्ये अक्षय कुमार आणि रितेश देशमुखसह अनेक स्टार्स दिसणार आहेत. आता या चित्रपटाबद्दल नवी अपडेट माहिती समोर आलीय. (Housefull 5)

साजिद नाडियाडवाला काय म्हणाले?

या चित्रपटाचे शूटिंग यूकेमध्ये होणार आहे. चित्रपटाचे निर्माते साजिद नाडियादवाला असून आम्ही यूके आणि सौदी अरेबियामध्ये शूटिंग करू, असे ते म्हणाले.

 

हाऊसफुलचा पहिला भाग २०१० मध्ये रिलीज झाला होता. त्यानंतर दुसरा २०१२ मध्ये, २०१६ मध्ये तिसरा आणि २०१९ मध्ये चौथा सिक्वेल रिलीज झाला होता. पहिले दोन भाग साजिद खानने दिग्दर्शित केले होते. त्याचवेळी तिसर्‍या भागात साजिद खानच्या जागी साजिद-फरहानने दिग्दर्शनाची केले होते. तर चौथा चित्रपट फरहाद सामजी यांनी दिग्दर्शित केला होता.

Back to top button