क्राईम ड्रामा वेबसीरीज ‘बॉम्बे मेरी जान’चा ट्रेलर रिलीज (Video) | पुढारी

क्राईम ड्रामा वेबसीरीज 'बॉम्बे मेरी जान'चा ट्रेलर रिलीज (Video)

अभिनेता के. के . मेनन व अभिनेता अविनाश तिवारी यांची क्राईम ड्रामा वेबसीरीज ‘बॉम्बे मेरी जान’ प्रक्षेकांच्या भेटीला आली आहे. नुकताच याचा ट्रेलर रिलीज झाला आहे. ही वेबसीरीज १४ सप्टेंबरला प्राइम व्हिडिओ ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. या वेबसीरीजची कथा एका प्रामाणिक पोलीस असणाऱ्या बापाची आणि त्याच्या मुलाची आहे, जो काही वेळातच अंडरवर्ल्डचा बादशाह होतो.

मुंबईमध्ये १९८०-९० च्या दशकात अंडरवर्ल्डची दहशत होती. यावरून अंडरवर्ल्डच्या गुंडगिरी व दहशतीच्या अनेक कथा चित्रपट व वेबसिजीच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला आल्या आहेत. यात ‘बॉम्बे मेरी जान’ या आणखी एका वेब सीरिजचे नाव जोडले जाणार असून आज त्याचा ट्रेलर रिलीज झाला आहे. केके मेनन, अविनाश तिवारी, कृतिका कामरा यासारखे दिग्गज कलाकार या वेबसीरीजमध्ये आहेत. ही वेबसीरीज एका प्रमाणिक पोलिसावर व अंडरवर्ल्डचा मार्ग स्वीकारलेल्या त्या पोलिसांच्या मुलावर गुंफणारी ही कथा असलेली आहे. एक्‍सेल एंटरटनेमेंटच्या या वेबसीरीजच्या कथेला फिक्शन क्राइम थ्रिलर असं म्हटलं गेलं आहे. कुठे ना कुठे ही कथा दाऊद इब्राहिमशी प्रेरित असल्याचे दिसून येत आहे.

रितेश सिधवानी, कासिम जगमगिया आणि फरहान अख्तर निर्मित ‘बंबई मेरी जान’ची कथा लेखक व पत्रकार एस हुसैन झैदी यांनी लिहिली आहे. झैदी यांनी मुंबईतील अंडरवर्ल्डला जवळून फक्त पाहिले नाही तर अनुभवलंही आहे. शुजात सौदागर हे या वेबसीरीजचे डायरेक्टर आहेत. लीड रोलमध्ये पोलिसांच्या भूमिकेत के. के मेनन असून अविनाश तिवारी हे त्यांच्या मुलाची भूमिका करीत आहेत. या वेबसीरीजचा ट्रेलर पाहताना दाऊद इब्राहिम नजरेसमोर येतो कारण तोही एका पोलिसाचा मुलगा होता. या मालिकेचे कथानक १९७० च्या दशकातील काल्पनिक बॉम्बेच्या रस्त्यांवर आधारित आहे.

१४ सप्टेंबरला प्राईम व्हिडिओवर प्रदर्शित

‘बॉम्बे मेरी जान’ ही १० भागांची मालिका आहे, जी १४ सप्टेंबरपासून ॲमेझॉन प्राईम व्हिडिओ वर हिंदी तसेच तमिळ, तेलुगु, मल्याळम, कन्नड आणि इंग्रजीमध्ये प्रदर्शित होईल. याशिवाय फ्रेंच, जर्मन, इटालियन, पोर्तुगीज, जपानी, पोलिश, लॅटिन स्पॅनिश, कॅस्टिलियन स्पॅनिश, अरबी आणि तुर्की या भाषांमध्येही ही मालिका परदेशी प्रेक्षकांसाठी उपलब्ध असेल.

Back to top button