Seema Haider : सीमा हैदरला बुलावा बिग बॉसचा? १७ व्या सीझनमध्ये दिसणार?

सीमा हैदर - सचिन
सीमा हैदर - सचिन

पुढारी ऑनलाईन डेस्क : सीमा हैदर आणि सचिन मीना यांची जोडी लवकरचएका मोठ्या टीव्ही शोमध्ये दिसणार असल्याची चर्चा सुरु आहे. त्यांना प्रसिद्ध रिअॅलिटी शो बिग बॉस आणि कॉमेडीच्या ऑफर्स मिळाल्याचा दावा केला जात आहे. मात्र, या दोघांनीही आपण सध्या कोणत्याही शोमध्ये सहभागी होणार नसल्याचे सांगितल्याची माहिती समोर येत आहे. (Seema Haider ) सीमा हैदरने सोशल मीडियावर एका व्हिडिओद्वारे शोमध्ये ऑफर मिळाल्याबद्दल सांगितले आहे. तिने असेही सांगितले की, तिला सध्या शोमध्ये जाण्याची इच्छा नाही. त्यांन सांगितले की, जर ते बिग बॉसमध्ये सहभागी झाले तर या प्रकरणाची माहिती मीडिया आणि लोकांना नक्कीच दिली जाईल. (Seema Haider)

बिग बॉस रिलीज डेट वाढली

चाहते बिग बॉस १७ बद्दल खूप उत्सुक आहेत. अलीकडेच, बिग बॉस OTT 2 संपला आणि विजेता युट्यूबर एल्विश यादव झाला. आता सलमान खानचा शो बिग बॉसचा १७ वा सीझन उशिरा सुरू होणार असल्याचे वृत्त येत आहे. याचे कारण म्हणजे ऑक्टोबरपासून सुरू होणारा आयसीसी विश्वचषक २०२३ होय. त्यामुळेच शोच्या निर्मात्यांनी २० ऑक्टोबरनंतर यासंदर्भात विचार करण्याचा निर्णय घेतला आहे.

सीमा हैदर शोमध्ये दिसणार?

ट्विटरवर नेटकऱ्यांनी सीमा हैदर आणि सचिन बिग बॉसच्या १७ व्या सीझनमध्ये स्पर्धक म्हणून येतील, असा अंदाज बांधण्यास सुरुवात केलीय.चित्रपट निर्माते अमित जॉनी यांनी यापुर्वीच सीमा हैदरला चित्रपटाची ऑफर दिली होती.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news