The Great Indian Family : विकी कौशलचे हे गाणं ऐकलं का? (Video)

vicky kaushal
vicky kaushal
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : यशराज फिल्म्सने आज खुलासा केला की, बहुप्रतीक्षित सिंगिंग सेंसेशन, भजन कुमार, ज्याला कंपनी मोठ्या धूमधडाक्यात लॉन्च करणार होती, तो दुसरा कोणी नसून बॉलिवूड स्टार विकी कौशल आहे! YRF च्या आगामी थिएटरिकल रिलीज द ग्रेट इंडियन फॅमिली (TGIF) मध्ये विकी भजन कुमार नावाच्या स्थानिक सिंगिंग स्टारची भूमिका साकारत आहे! आज विकीला भजन कुमार म्हणून समोर आणत, 'YRF ने TGIF चे कन्हैया ट्विटर पे आजा' नावाचे पहिले सॉन्ग देखील लॉन्च केले. या चित्रपटातील विकीचे सर्वात मोठे एन्ट्री सॉन्ग आहे.

विकी कौशलने खुलासा केला, मी आमच्या वेगळ्या कौटुंबिक मनोरंजन द ग्रेट इंडियन फॅमिलीमध्ये भजन कुमार नावाच्या एका गायकाची भूमिका साकारत आहे.

तो पुढे म्हणतो, "एक अभिनेता म्हणून मला लोकांच्या चेहऱ्यावर हसू आणायला आवडते आणि मला आशा आहे की, मी ते साध्य करू शकेन. मला आशा आहे की TGIF मधील माझा नवीन अवतार लोकांना आवडेल. भजन कुमारला प्रेक्षकांचा कसा प्रतिसाद मिळतो हे पाहण्यासाठी मी उत्सुक आहे."

TGIF हे विजय कृष्ण आचार्य दिग्दर्शित YRF आणि विकी कौशल यांचा हा पहिला चित्रपट आहे. 'कन्हैया ट्विटर पे आजा' हे गाणे प्रीतम यांनी संगीतबद्ध केले आहे आणि अमिताभ भट्टाचार्य यांनी लिहिले आहे. TGIF २२ सप्टेंबर रोजी जगभरात रिलीज होणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news