'चांद्रयान 3' लँडिंगची बॉलिवूड सेलेब्रेटींमध्येही उत्‍सुकता; अशा दिल्‍या शुभेच्छा | पुढारी

'चांद्रयान 3' लँडिंगची बॉलिवूड सेलेब्रेटींमध्येही उत्‍सुकता; अशा दिल्‍या शुभेच्छा

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : भारताची चांद्रयान 3 (Chandrayaan 3) मोहीम ही आता अंतिम टप्प्यात आली आहे. आतापर्यंतचे सर्व टप्पे यशस्वीरित्या पार पाडले आहेत. इस्रोने चांद्रयान 3 चे विक्रम लँडर चंद्रावर (Chandrayaan-3 Mission) उतरणार आहे, असे 20 ऑगस्टला सांगितले होते. आनंदाची ही बातमी ऐकण्यासाठी भारतीयांचे कान आसुसले आहेत. यासोबतच हा काळ जसजसा जवळ येत आहे, तसतसा देशवासीयांचा उत्साह आणि अपेक्षा वाढल्‍या आहेत. दरम्‍यान, यावर बॉलिवूडमधून काही प्रतिक्रिया येत आहेत.

मी आणि सर्व देशवासी या मोहिमेसाठी प्रार्थना करत आहे : हेमा मालिनी

या खास प्रसंगी बॉलिवूडची ड्रीम गर्ल हेमा मालिनी यांनी आपली प्रतिक्रिया दिली. यावेळी ती खूप आनंदी होती. अंतराळातून चांद्रयान 3 चे फोटो  इस्रोने शेअर केले यावर हेमा मालिनी म्हणाली, चांद्रयान 3 च्या लँडिंगसाठी शुभेच्छा, आता लवकरच चांद्रयान 3 चंद्रावर उतरणार आहे. आपल्या देशासाठी हा अभिमानाचा क्षण आहे आणि मी आणि सर्व देशवासी या मोहिमेसाठी प्रार्थना करत आहेत.

प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाचा क्षण : करीना कपूर

बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूरनेही प्रतिक्रिया दिली आहे. ती म्हणाली हा देशासाठी खूप खास आणि प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाचा क्षण आहे. यावेळेची आपण सर्वजण वाट पाहत आहोत. मला माझ्या दोन्ही मुलांसोबत या खास क्षणाचा आनंद घ्यायचा आहे.

प्रकाश राज यांनी केला मीम शेअर

साऊथ सुपरस्टार प्रकाश राज यांनी चंद्रयान 3 शी संबंधित एक मीम शेअर केला होता.

नुकतेच रशियाचे लूना मिशन क्रॅश झाले आणि त्यामुळे भारतीय खूप जागरूक झाले आहेत. हे क्षण जितके खास आहेत तितकेच ते अवघडही आहेत. हा एक महत्त्वाचा टप्पा आहे आणि चांद्रयान 3 त्याच्या मोहिमेत पूर्णपणे यशस्वी व्हावे अशी सर्व देशवासीयांची इच्छा आहे, अशी बॉलिवूड प्रतिक्रिया येत आहेत.

.हेही वाचा  

X चे फॉलोअर्स घटणार! एलॉन मस्क यांचे ४२ टक्के फॉलोअर्स फेक

तोंडाने 80 किलो वजन उचलण्याचा विश्वविक्रम

Jailer : रजनीकांतच्या ‘जेलर’ चा विक्रम ५०० कोटींचा टप्पा पार

Back to top button