

पुढारी ऑनलाईन डेस्क : अभिनेता प्रकाश राजने चांद्रयान – ३ ची खिल्ली उडवलीय. त्यांनी ट्विटरवर एक मिश्किल पोस्ट केल्याने सोशल मीडिया युजर्सनी त्यांना धारेवर धरले. साऊथ अभिनेता प्रकाश राज यांनी चांद्रयान -३ विषयी एक फोटो ट्विट केले आहे. एकीकडे चांद्रयान -३ चे यशस्वी लॉन्चिंग वरून संपूर्ण देशाला अभिमान आहे. भारतीय शास्त्रज्ञांचा सर्वांना अभिमानही आहे. आता चांद्रयान -३ चंद्रावर उतरण्याच्या अंतिम टप्प्यात आहे. दरम्यान, प्रकाश राजने अशी काही पोस्ट केली युजर्सना संताप अनावर झाला आहे.
प्रकाश राज यांनी एक व्यंगचित्र शेअर करून त्याला चांद्रयानचे पहिले दृश्य नुकतेच आले.. #VikramLander #justasking अशी कॅप्शन दिलीय. हे चित्र तुम्ही पाहू शकता. एका सोशल मीडिया युजरने लिहिलंय, अभिनेता, आपण अशी पोस्ट करून समस्त राष्ट्राचा अपमान करत आहात. तर आणखी एकाने म्हटलंय-'Prakash Raj यांच्या बुद्धीवर कुणीतरी उपचार करा रे' .