प्रसिद्ध वेबसिरिजमधील बौद्ध विवाहाच्या सीनबाबत प्रकाश आंबेडकरांचं ट्वीट चर्चेत… | पुढारी

प्रसिद्ध वेबसिरिजमधील बौद्ध विवाहाच्या सीनबाबत प्रकाश आंबेडकरांचं ट्वीट चर्चेत...

पुढारी ऑनलाईन :  ओटीटीच्या जगात सध्या ‘मेड ईन हेवन 2’ या सिरिजची चांगलीच चर्चा आहे. रीमा कागती, झोया अख्तर, अलंकृता श्रीवास्तव या दिग्दर्शक त्रयींच्या कल्पनेतून जन्माला आलेल्या या सिरिजचा दुसरा सीझनही लोकप्रियता मिळवत आहे. या सिरिजचा एक एपिसोड मात्र सध्या भलताच ट्रेंड होतो आहे. याला किनार आहे बौद्ध विवाहपद्धतीची.

या सीझनच्या पाचव्या एपिसोडमध्ये एक बौद्ध विवाहाचा सीन आहे. अभिनेत्री राधिका आपटे या एपिसोडमध्ये मुख्य भूमिकेत आहे. या एपिसोडमध्ये ती एका दलित वधूच्या भूमिकेत दिसते आहे. The Heart Skipped a Beat असं या एपिसोडचं नाव आहे. पल्लवी मांडके असं तिच्या या व्यक्तिरेखेचं नाव आहे. वकील, लेखिका आणि मागासवर्गीयांच्या हक्कासाठी लढणारी कार्यकर्ती अशी तिच्या पात्राची ओळख आहे. या एपिसोडमध्ये ती तिच्या भावी पण उच्चवर्णीय पतीला बौद्ध विवाहासाठी तयार करते.

या एपिसोडबाबत वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी ट्वीट करत कौतूक केलं आहे. ते आपल्या ट्वीटमध्ये म्हणतात, ” मला पल्लवी या दलित स्त्री पात्राचा ठामपणा, बंडखोरपणा आणि प्रतिकार करण्याची लढाऊवृत्ती आवडली. ज्यांनी हा एपिसोड पाहिला आहे त्या वंचीत आणि बहुजनांसाठी – तुमची ओळख पटवा आणि मगच तुम्हाला राजकीय महत्त्व प्राप्त होईल. पल्लवीने सांगितल्याप्रमाणे, ‘सर्व काही राजकारणाशी संबंधित आहे.’ जय भीम!”

या सीनचं अनेकांनी कौतुक केलं आहे तर अनेकांनी यावर संमिश्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. तर अनेकांनी पहिल्यांदाच बौद्ध विवाहाला पडद्यावर स्थान दिल्याचं म्हटलं आहे.

हेही वाचा :

शरद पवार यांनी घेतली ना. धों. महानोर यांच्या कुटुंबीयांची सांत्वनपर भेट

Actor Darren Kent Death : ‘गेम ऑफ थ्रोन्स’ फेम ॲक्टर डॅरेन केंटचे निधन

Back to top button