Actor Darren Kent Death : ‘गेम ऑफ थ्रोन्स’ फेम ॲक्टर डॅरेन केंटचे निधन

Actor Darren Kent Death : ‘गेम ऑफ थ्रोन्स’ फेम ॲक्टर डॅरेन केंटचे निधन
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : गेम ऑफ थ्रोन्स (Game of Thrones) फेम अभिनेता डॅरेन केंट (Actor Darren Kent) याचे निधन झाले आहे. वयाच्या 36 व्या वर्षी त्याने जगाचा निरोप घेतला. मीडिया रिपोर्ट्सनुसार, केंटने 11 ऑगस्ट रोजी अखेरचा श्वास घेतला. अमेरिकेच्या टॅलेंट एजन्सी कॅरी डॉड असोसिएट्सने मंगळवारी ट्विटरवर निवेदन जारी करताना अभिनेत्याच्या मृत्यूची पुष्टी केली. (Game of Thrones Actor Darren Kent Passes Away)

टॅलेंट एजन्सीने ट्विटमध्ये म्हटले आहे की, 'आम्हाला अत्यंत दु:खाने जाहीर करतो की आमचा प्रिय मित्र आणि प्रसिद्ध अभिनेता डॅरेन केंट याचे शुक्रवारी निधन झाले. निधनावेळी त्याचे आई-वडील आणि जिवलग मित्र त्याच्यासोबत होते. या कठीण काळात आम्ही केंटच्या कुटुंबासोबत आहे. केंटला भावपूर्ण श्रद्धांजली,' अशी भावना व्यक्त केली आहे.

अभिनेता डॅरेन केंट (Actor Darren Kent) दीर्घकाळ ऑस्टिओपोरोसिस, संधिवात आणि त्वचा विकारांशी झुंज देत होता. त्याच्या त्वचेचे विकार अगदी दुर्मिळ होते. आजाराशी प्रदीर्घ लढा दिल्यानंतर अखेर मंगळवारी या अभिनेत्याने अखेरचा श्वास घेतला. (Game of Thrones Actor Darren Kent Passes Away)

गेम ऑफ थ्रोन्स वेब सीरिजमध्ये साकारले 'स्लिव्हर्स बे' पात्र

केंटचा (Actor Darren Kent) जन्म यूकेमधील एसेक्स येथे झाला. त्यांचे बालपण तिथेच गेले. त्यानंतर 2007 मध्ये, त्याने कला आणि रंगभूमीसाठी प्रसिद्ध असलेल्या इटालिया कॉन्टी या संस्थेतून पदवी प्राप्त केली. त्याने 2008 मध्ये मिरर्स या हॉरर चित्रपटातून आपल्या करिअरला सुरुवात केली. त्यानंतर त्याने एमी पुरस्कार विजेत्या गेम ऑफ थ्रोन्स या वेब सीरिजमध्ये काम केले. केंटने गेम ऑफ थ्रोन्समध्ये 'स्लिव्हर्स बे' हे पात्र साकारले. तो अलीकडेच 2023 च्या 'डंगऑन ॲन्ड ड्रेगन्स : ऑनर अमंग थीव्स' (Dungeons & Dragons: Honor Among Thieves) या चित्रपटात दिसला होता. याशिवाय त्याने स्नो व्हाईट अँड द हंट्समन, मार्शल लॉ, ब्लडी कट्स, द फ्रँकेन्स्टाइन क्रॉनिकल्स, ब्लड ड्राइव्ह आणि ब्रदर्स सॉरो या चित्रपटांमध्येही काम केले आहे.

अभिनेता असण्यासोबतच लेखक आणि दिग्दर्शक

केंटला (Actor Darren Kent) 2012 च्या सनी बॉय चित्रपटासाठी व्हॅन डी'ओर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यामध्ये अभिनेत्याने डॅनी नावाच्या दुर्मिळ त्वचेच्या आजाराने ग्रस्त असलेल्या मुलाची भूमिका साकारली होती. या पात्रासाठी केंटला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला. चित्रपटातील त्याच्या पात्राप्रमाणे, केंटलाही ऑस्टिओपोरोसिस आणि संधिवात तसेच त्वचेच्या आजारांनी ग्रासले होते. अभिनयाव्यतिरिक्त केंट हा पुरस्कार विजेता लेखक आणि दिग्दर्शक देखील होता, ज्याने 2021 मध्ये 'यू नो मी' या लघुपटाचे दिग्दर्शन केले होते. (Game of Thrones Actor Darren Kent Passes Away)

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news