Akshay Kumar citizenship | अभिनेता अक्षय कुमारला स्वातंत्र्यदिनी मिळाले भारतीय नागरिकत्व, म्हणाला, ”मन आणि नागरिकत्व दोन्ही हिंदुस्तानी!” | पुढारी

Akshay Kumar citizenship | अभिनेता अक्षय कुमारला स्वातंत्र्यदिनी मिळाले भारतीय नागरिकत्व, म्हणाला, ''मन आणि नागरिकत्व दोन्ही हिंदुस्तानी!''

नवी दिल्ली, पुढारी ऑनलाईन : बॉलिवूडचा अभिनेता अक्षय कुमार (Actor Akshay Kumar)  आता भारतीय नागरिक बनला आहे. ”मन आणि नागरिकत्व, दोन्ही हिंदुस्तानी. स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा!” असे अक्षय कुमारने ट्विट करत म्हटले आहे.

अक्षय कुमार कॅनडाचा नागरिक होता. त्याने आता कॅनडाचे नागरिकत्व (Canadian passport) सोडून भारतीय नागरिकत्व स्वीकारले आहे. आज १५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिनी त्याला भारतीय नागरिकत्व मिळाले आहे. त्याने देशाच्या ७७ व्या स्वातंत्र्यदिनी भारतीय नागरिकत्व मिळाल्याचा अधिकृत सरकार दस्तावेजाचा एक फोटो शेअर केला आहे.

अक्षय हा यापूर्वी कॅनडाचा नागरिक (akshay kumar canadian citizenship) होता. त्यामुळे त्याच्यावर अनेकदा टीकाही झाली होती. सोशल मीडियावर अक्षयला लोक कॅनेडियन कुमार (Canadian Kumar) असे टॅग देत होते. त्याला ट्रोल करताना लोक त्याच्या चित्रपटांवरही निशाणा साधत होते. ‘तू भारतात काम करतोस, येथे तू कमवतोस. पण तुझ्याकडे भारतीय नागरिकत्व का नाही. तुझ्याकडे दुसऱ्या देशाचे नागरकित्व आहे.’ असे सवाल करत त्याला ट्रोल केले जात होते. त्यावर अनेकदा अक्षयने ‘मेरा दिल हिंदुस्तानी है’ असा खुलासा केला आहे. (akshay kumar citizenship)

भारत माझ्यासाठी सर्वकाही आहे. मी जे काही कमवले आहे ते येथे राहून कमवले आहे आणि मी स्वतःला नशीबवान समजतो की मला परतण्याची संधी मिळाली. माझ्या नागरिकत्वाविषयी सवाल केले जातात तेव्हा मला वाईट वाटते. मला जेव्हा कॅनेडियन कुमार म्हटले जाते तेव्हा तर मला खूप वाईट वाटते, असे अक्षयने एका मुलाखतीत म्हटले होते.

अक्षयचा नुकताच रिलीज झालेला OMG २ हा शुक्रवारी रिलीज झाला होता आणि गदर २ शी स्पर्धा असूनही बॉक्स ऑफिसवर OMG २ चांगली कामगिरी करत आहे. (Akshay Kumar citizenship)

हे ही वाचा :

Back to top button