‘OMG 2’| ‘ओएमजी-२’ चित्रपटाला ‘ए’ प्रमाणपत्र मिळाल्याने यामी गौतमी नाराज | पुढारी

'OMG 2'| 'ओएमजी-२' चित्रपटाला 'ए' प्रमाणपत्र मिळाल्याने यामी गौतमी नाराज

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलीवूड अभिनेत्री यामी गौतमी तिच्या आगामी ‘OMG 2’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटात तिने वकिलाची भूमिका साकारलेली आहे. यामीसोबत अभिनेता अक्षय कुमार आणि पंकज त्रिपाठी अशी स्टार कास्ट या चित्रपटातून दिसणार आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर गदर – 2 शी टक्कर देईल, असे बोलले जात आहे. आज (दि. ११) सिनेमागृहात हा चित्रपट प्रदर्शित झाला. प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे. दरम्यान, यामी गौतमीने चित्रपटाला ‘ए’ प्रमाणपत्र मिळाल्याबद्दल खंत व्यक्त केली आहे.

रिलीजपूर्वीच हा चित्रपट अनेक वादांच्या भोवऱ्याच अडकला होता. आता यामी गौतमीने यावर आपले मौन सोडले आहे. सेन्सॉर बोर्डाकडून चित्रपटाला ‘ए’ प्रमाणपत्र मिळाल्याबद्दल यामीने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सांगितले की, ‘सीबीएफसीने आमचा चित्रपट ‘ए’ प्रमाणपत्रासह चित्रपटाला २७ दुरुस्त्या करून पास केल्याचे समजताच मी निराश झाले. आम्ही खूप अपेक्षा ठेवून चित्रपट बनवत असतो. आमचा हेतू कोणाच्याही भावना दुखावण्याचा नसतो.

माझ्यासाठी काही महत्त्वाच्या भूमिका करणे महत्त्वाचे आहे. मला नेहमीच महत्त्वाच्या भूमिका करायला आवडतात. विकी डोनर या माझ्या पहिल्या चित्रपटातही माझी ही महत्त्वाची भूमिका होती. हा चित्रपट एका संकल्पनेवर आधारित होता. तसेच समाजाच्या प्रबोधनावर भर दिला होता. त्यामुळेच मी या चित्रपटात काम करण्याचा निर्णय घेतला.

‘OMG 2’ हा चित्रपट 2012 मध्ये आलेल्या सुपरहिट चित्रपट ‘Oh My God’ चा सिक्वेल आहे. आज हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. अक्षयकुमारचे चाहते बऱ्याच दिवसांपासून त्याच्या चित्रपटाची वाट पाहत होते. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरला, तर अक्षयकुमारच्या कारकिर्दीला उभारी मिळणार आहे.

दरम्यान, अक्षय कुमारच्या OMG-2 चा टीझर समोर आला आहे. ११ जुलै रोजी व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. व्हिडिओमध्ये अक्षयच्या कपाळावर भस्म, गळ्यात रूद्राक्षाच्या आणि माळा आणि लांबलचक जटा असा लूक दाखवण्यात आला आहे. ‘हर हर महादेव’चा जयघोष करत लोकांच्या गर्दीतून अक्षय फिरताना दिसत आहे. अक्षयने भगवान शिवाची भूमिका चित्रपटात साकारली आहे.

टीझरमध्ये एक सीन दाखविण्यात आला आहे. त्यामध्ये भगवान शिवच्या अवतारात असलेला अक्षय एका रेल्वे ट्रॅकवर बसला आहे आणि यार्डच्या पाईपलाईनमधून त्याच्यावर पाणी पडत आहेत. या सीनवर सेन्सॉर बोर्डने आक्षेप घेतला आहे. अस्वच्छ पाणी पडताना दिसत आहे, या सीनवरून वाद हहोऊ नये, याबद्दलचाही विचार सेन्सॉर बोर्ड  करत आहे. या सीन वरून वादविवादा होण्याची शक्यता असल्यानेच सीबीएफसीने निर्णय घेत आहे.

हेही वाचा 

Back to top button