पुढारी वृत्तसेवा : 'बिग बॉस ओटीटी 2'च्या फॅन पेजने यंदा विजेता कोण ठरणार, याचा एक सर्व्हे केला होता. त्यात तूर्तास एल्विश यादवने बाजी मारल्याचे स्पष्ट झाले आहे. एल्विशला सर्वाधिक 1.84 लाख मते मिळाली आहेत.
'बिग बॉस ओटीटी 2' आपल्या अंतिम टप्प्यात असून 14 ऑगस्ट रोजी खास ग्रँड फिनालेमध्ये विजेत्याची अधिकृत घोषणा केली जाणार आहे. एल्विश यादव व अभिषेक मल्हान यांच्यातील टक्कर रंगत आली आहे. साहजिकच जेतेपदी कोण बाजी मारणार, याची प्रेक्षकांमध्ये मोठी उत्सुकता आहे. विजेता एकच असेल, हे निश्चित आहे.
सोशल मीडियावर मात्र विजेतेपद कोणाकडे यावरून बरीच चर्चा रंगली आहे. मनीषा राणीदेखील स्पर्धेत आहे. जिया शंकर अलीकडेच एलिमिनेट झाली असून टॉप 5 स्पर्धक यापूर्वी निश्चित झाले आहेत. लालूप्रसाद यादव यांचे सुपुत्र तेजस्वी यादव यांनी एल्विशला मतदान करण्याबाबत आवाहन केले असून यामुळे ही स्पर्धा वेगळ्याच व्यासपीठावर पोहोचल्याचेही चित्र आहे.