OMG 2 वर ‘सेन्सॉर’चा आक्षेप? वादग्रस्त ठरू नये म्हणून रिव्हिजन कमिटीकडे पाठवला | पुढारी

OMG 2 वर 'सेन्सॉर'चा आक्षेप? वादग्रस्त ठरू नये म्हणून रिव्हिजन कमिटीकडे पाठवला

पुढारी ऑनलाईन डेस्क : काहीच दिवसांपूर्वी प्रभासच्या ‘आदिपुरुष’ चित्रपटामुळे सेन्सॉर बोर्डाची चांगलीच तारांबळ उडाली होती. यामुळेच आता CBFC ने बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारच्या आगामी ‘ओह माय गॉड 2’ (OMG 2) या चित्रपटावर कडक नजर ठेवल्याची माहिती समोर आली आहे. हा चित्रपट ११ ऑगस्ट २०२३ ला रिलीज होण्याची तयारीत असताना सेन्सॉर बोर्डाने तो रिव्हिजन कमिटीकडे पाठवला आहे. टिझर रिलीज झाल्यानंतर काहींना चित्रपट खूप आवडला तर काही नेटकऱ्यांनी त्यातील सीन्सवर आक्षेप घेतला.

रिपोर्ट्सनुसार, ‘टिझरमध्ये सध्या चित्रपटातील कोणतेही सीन पूर्णत: दाखविण्यात आलेले नाहीत. यामुळे कोणतीही समस्या नाही. परंतु, दुसरीकडे सेन्सॉर बोर्डाची प्रक्रिया सुरू असून चित्रपटावर नजर ठेवली जात आहे. तर रिव्हिजन कमिटीकडून मंजुरी मिळाल्यानंतर या चित्रपटाला रिलीजसाठी ग्रीन सिग्नल मिळणार असल्याची माहिती मिळत आहे.

अक्षय कुमारच्या OMG-2 चा टीझर समोर आला आहे. ११ जुलै रोजी व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. व्हिडिओमध्ये अक्षयच्या कपाळावर भस्म, गळ्यात रूद्राक्षाच्या आणि माळा आणि लांबलचक जटा असा लूक दाखवण्यात आला आहे. ‘हर हर महादेव’चा जयघोष करत लोकांच्या गर्दीतून अक्षय फिरताना दिसत आहे. अक्षयने भगवान शिवाची भूमिका चित्रपटात साकारली आहे.

टीझरमध्ये एक सीन दाखविण्यात आला आहे. त्यामध्ये भगवान शिवच्या अवतारात असलेला अक्षय एका रेल्वे ट्रॅकवर बसला आहे आणि यार्डच्या पाईपलाईनमधून त्याच्यावर पाणी पडत आहेत. या सीनवर सेन्सॉर बोर्डने आक्षेप घेतला आहे. अस्वच्छ पाणी पडताना दिसत आहे, या सीनवरून वाद हहोऊ नये, याबद्दलचाही विचार सेन्सॉर बोर्ड  करत आहे. या सीन वरून वादविवादा होण्याची शक्यता असल्यानेच सीबीएफसीने निर्णय घेत आहे.

निर्मात्यांनी चित्रपटात वकिलाची भूमिका साकारणाऱ्या यामी गौतमचे पोस्टर रिलीज केले आहे. चित्रपटात पंकज त्रिपाठीही मुख्य भूमिकेत आहे. हा चित्रपट ११ ऑगस्ट २०२३ रोजी चाहत्याच्या भेटीस येत आहे.

हेही वाचा : 

 

View this post on Instagram

 

A post shared by Akshay Kumar (@akshaykumar)

Back to top button