Rajinikanth : Jailer चित्रपटाचा उत्सव! दक्षिणेत थलैवाच्या चित्रपटासाठी सुट्टी जाहीर | पुढारी

Rajinikanth : Jailer चित्रपटाचा उत्सव! दक्षिणेत थलैवाच्या चित्रपटासाठी सुट्टी जाहीर

पुढारी ऑनलाईन डेस्क : मेगास्टार रजनीकांत पुन्हा एकदा आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकण्यासाठी सज्ज झाले आहेत. त्यांचा जेलर हा चित्रपट लवकरच चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. (Rajinikanth : Jailer) थलैवाच्या या चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. (Rajinikanth : Jailer) जेलर हा चित्रपट १० ऑगस्ट रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. अशा परिस्थितीत रजनीकांत यांचे फॅन फॉलोइंग पाहता चेन्नई आणि बंगळुरूमध्ये सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. जेलर हा तमिळ चित्रपट पाहण्यासाठी ही सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. एवढेच नाही तर चेन्नई आणि बंगळुरूमधील काही कंपन्यांनी रजनीकांत यांच्या चित्रपटांची मोफत तिकिटेही त्यांच्या कर्मचाऱ्यांना वाटप केली आहेत.

एका वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, जेलरच्या रिलीज दिवशी चेन्नई आणि बेंगळुरूमध्ये सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. एका कंपनीने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरून सुट्टीची घोषणाही केली आहे. नुकताच साऊथचा मेगास्टार रजनीकांतचा मोस्ट अवेटेड ‘जेलर’ या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. ज्याला थलैवाच्या चाहत्यांनी आणि प्रेक्षकांना खूप पसंती दिली आहे. जेलर चित्रपटात रजनीकांतसोबत रम्या कृष्णन, जॅकी श्रॉफ, तमन्ना भाटिया, शिव राजकुमार, सुनील आणि योगी बाबू असे दिग्गज प्रमुख भूमिकेत आहेत.

या चित्रपटात जॅकी श्रॉफ खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे. रजनीकांत जेलर चित्रपटात जेलर मुथुवेलच्या भूमिकेत दिसणार आहे. तुरुंगातून एक खतरनाक टोळीला आपल्या म्होरक्याला सोडवायचं असतं. पण मुथुवेल, एक कडक पोलीस, एक प्रामाणिक अधिकारी आहे, जो घरी शांत माणूस आहे. मुलगी आणि मुलाला त्याच्या (रजनीकांत) दुसऱ्या भयानक रुपाबद्दल कल्पना नाही. जॅकी श्रॉफला रजनीकांत (जेलर) यांचे खरे रूप माहीत आहे. या माहितीचा फायदा घेत तो मुथुवेलला कशी जबरदस्ती करतो…पुढील कहाणी समजण्यासाठी तुम्हाला चित्रपट पाहावा लागेल.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sun Pictures (@sunpictures)

Back to top button