Pushpa The Rule : Fahadh Faasil च्या वाढदिवसाला पुष्पाचे नवे पोस्टर रिलीज?

Fahadh Faasil
Fahadh Faasil

पुढारी ऑनलाईन डेस्क : साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जुनचा चित्रपट पुष्पाचं वेड अजूनही प्रेक्षकांना लागून आहे. चाहते तर पुष्पाच्या पुढच्या भागाची प्रतीक्षा करत आहेत. चित्रपटामध्ये अल्लू अर्जुनच्या शानदार अभिनयाने सगळीकडे त्याची वाहव्वा होत आहे. (Pushpa The Rule : Fahadh Faasil ) परंतु, चित्रपटाच्या शेवटी १५ मिनिटांमध्ये एका आयपीएस अधिकारी भंवर सिंह शेखावत याच्या धमाकेदार एन्ट्रीने पूर्ण कहाणीचं बदलून गेली होती. पुष्पा या चित्रपटाचा आयपीएस अधिकारी भंवर सिंह शेखावत अर्थातच फहाद फासिल याचा आज ८ ऑगस्ट रोजी वाढदिवस आहे. दरम्यान, पुष्पा २ द रुलचे नवे पोस्टर रिलीज झाले असून भंवर सिंह शेखावतचा नवा लूक यामध्ये पाहायला मिळत आहे. हे पोस्टर ट्विटरवर काही अकाऊंटवर शेअर करण्यात आले आहे. (Pushpa The Rule : Fahadh Faasil )

Fahadh Faasil
Fahadh Faasil

फहाद फासिल कोण आहे?

केवळ १५ मिनिटांमध्ये आपली छाप सोडण्यात यशस्वी ठरलेल्या या आयपीएस अधिकाऱ्याविषयी जाणून घेण्यासाठी वाचक उत्सुक आहेत. फहाद फासिलने मल्ल्याळम आणि तमिळमधील अनेक चित्रपटांमध्ये अनेक दमदार अभिनय करून आपल्या नावाचा डंका वाजवला आहे. फहादने आपल्या चित्रपट करिअची सुरुवात २००२ मध्ये 'कायेथुम दुराथ' चित्रपटातून केली होती. पण, हा चित्रपट दुर्दैवाने फ्लॉप ठरला. चित्रपट फ्लॉप झाल्यानंतर त्याने आपला अभिनय सोडून शिक्षण पूर्ण करण्याचा निर्णय घेतला. फहाद अमेरिकेला गेला. तेथे त्याने आपले शिक्षण पूर्ण केले. याचदरम्यान, पुन्हा एकदा त्याने अभिनय क्षेत्राकडे वळण्याचा निर्णय घेतला.

फहादने 'यूं होता तो क्या होता' चित्रपट पाहिला. या चित्रपटामध्ये अभिनयाची भूमिका साकारणाऱ्या अभिनेता इरफान खानचा अभिनय त्याला फार आवडला. तो अभिनेता इरफान खानचा फॅन झाला. फहादने इरफानचे एकानंतर एक त्याने अनेक चित्रपट पाहिले. फहादने इंडस्ट्रीत आपल्या शानदार अभिनयाने अनेक हिट चित्रपटात काम केलं आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news