चला हवा येऊ द्या : अक्षय कुमार याचा जबरदस्त परफॉर्मन्स

चला हवा येऊ द्या : अक्षय कुमार याचा जबरदस्त परफॉर्मन्स
Published on
Updated on

झी मराठीवरील लोकप्रिय कार्यक्रम चला हवा येऊ द्या आणि त्यातील विनोदवीर वर्षानुवर्षे प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करत आहेत. केवळ महाराष्ट्रातच नाही. तर जगाच्या कानाकोपऱ्यातील प्रेक्षकांकडून या कार्यक्रमाला पसंती मिळत आहे. या कार्यक्रमाची लोकप्रियता इतकी आहे की, मराठी सोबत हिंदी कलाकार सुद्धा 'चला हवा येऊ द्या'च्या मंचावर येत असतात. अशातच बॉलिवूड सुपरस्टार अक्षय कुमार, जॅकी श्रॉफ आणि रोहित शेट्टी हे 'चला हवा येऊ द्या' मध्ये आले आहेत. या आठवड्यात प्रेक्षकांना हे विशेष भाग पाहायला मिळतील. खिलाडी अक्षय कुमार याने फक्त या मंचावर हजेरी लावली. इतकचं नाही तर त्याच्या ढासू स्टाईलमध्ये एक जबरदस्त परफॉर्मन्स सुद्धा दिला.

त्याचा हा परफॉर्मन्स इतका अफलातून होता की, टाळ्या आणि शिट्या थांबल्या नाहीत. हे सर्व कलाकार त्यांचा आगामी सिनेमा सूर्यवंशीच्या प्रमोशनच्या निमित्ताने चला हवा येऊ द्याच्या मंचावर आले होते.

तसेच डॉक्टर निलेश साबळेने सोशल मीडियावर अक्षयसोबतचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये दोघेही खूप खुश दिसत आहे. हा फोटो शेअर करून त्याने लिहिले आहे की, 'आ रही है पुलिस, सुपरस्टार खिलाडी येणार, आपल्या मंचावर दंगा होणार, दिवाळीचा सुपरहिट धमाका. सुर्यवंशी'ची ऍक्शन आणि 'चला हवा येऊ द्या'ची कॉमेडी ऍक्शनच्या माध्यमाने पहिल्यांदाच अक्षयचा मराठमोळा अंदाज पहायला मिळणार आहे.

सोशल मीडियावर या विशेष एपिसोडमधील एक सीन देखील शेअर केला आहे. याची झलक पाहून प्रेक्षकांना हसणे आवरणार नाही. हा व्हिडिओ पाहून आपण नक्कीच अंदाज लावू शकतो की, येत्या आठवड्यात 'चला हवा येऊ द्या' च्या मंचावर आपल्याला धमाल मस्ती पाहायला मिळणार आहे.

त्यामुळे पाहायला विसरू नका – चला हवा येऊ द्या सोमवार ते बुधवारी रात्री ९.३० वाजत फक्त आपल्या झी मराठीवर.

 

View this post on Instagram

 

A post shared by Akshay Kumar (@akshaykumar)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news