कन्नड अभिनेता विजय राघवेंद्रची पत्नी स्पंदनाचा हार्ट ॲटॅकने निधन | पुढारी

कन्नड अभिनेता विजय राघवेंद्रची पत्नी स्पंदनाचा हार्ट ॲटॅकने निधन

पुढारी ऑनलाईन डेस्क : कन्नड अभिनेता विजय राघवेंद्रची पत्नी स्पंदना राघवेंद्र हिचे हार्ट ॲटॅकने निधन झाले. ही घटना घडल्यावेळी दोघे थायलंडमध्ये होते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, विजय राघवेंद्रची पत्नी स्पंदनाला कमी रक्तदाब होता. त्यामुळे तिला हार्टॲटॅक आला. तिचे पार्थिव भारतात परत आणला जाणार आहे.

२६ ऑगस्ट २००७ मध्ये होते दोघांचे लग्न झाले होते. स्पंदना राघवेंद्र सहाय्यक पोलिस आयुक्त बी. के. शिवराम यांची मुलगी आहे. या कपलला एक मुलगादेखील आहे, त्याचे नाव शौर्य आहे.

स्पंदनाच्या आकस्मिक निधनानंतर इंडस्ट्री शोककळा पसरली आहे. आता भारतात तिच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्याची तयारी सुरू झाली आहे.

Back to top button