ना अभिनय, ना रॅम्प वॉक | पुढारी

ना अभिनय, ना रॅम्प वॉक

अभिनेत्री सारा अली खान आणि अभिनेता आदित्य रॉय कपूर यांच्या रॅम्प वॉकची सध्या चर्चा रंगली आहे. दोघांनीही डिझाईनर शांतनू आणि निखिलसाठी इंडिया कॉऊचर वीक – 2023 मध्ये शोस्टॉपर म्हणून रॅम्प वॉक केला. या दोघांच्या रॅम्प वॉकचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. साराने इंडिया कॉऊचर वीक -22023 मध्ये ऑफ व्हाईट क्रीम रंगाचा लेहेंगा घातला होता. तर, दुसरीकडे पांढर्‍या सलवारसह क्रीम कलरची शेरवानी आदित्यने घातली होती. दोघांनीही शो स्टॉपर म्हणून रॅम्प वॉक केला. दोघांचा व्हिडीओ व्हायरल झाल्यावर नेटकर्‍यांनी आदित्यचे भरभरून कौतुक केले मात्र, साराच्या चेहर्‍यावरील हावभावांमुळे तिला ट्रोल करण्यात आले. साराचे रॅम्प वॉक करतानाचे हावभाव पाहून तिला ट्रोल केले जात आहे. सारा इथेही खूप जास्त ओव्हरअ‍ॅक्टिंग करते आहे, अशी एकाने तर हिला रॅम्पवॉक करता येत नाही, किती भयानक चालतेय, ना अभिनय, ना रॅम्प वॉक आम्हाला हिचे काहीच आवडत नाही, अशा कमेंट अनेकांनी केल्या आहेत.

Back to top button