Raqesh Bapat : अभिनेता राकेश बापट रुग्णालयात दाखल

अभिनेता राकेश बापट
अभिनेता राकेश बापट
Published on: 
Updated on: 

पुढारी ऑनलाईन डेस्क : टीव्ही अभिनेता राकेश बापट रुग्णालयात दाखल झाला आहे. त्याचा एक फोटो समोर येताच फॅन्स चिंतेत पडले आहेत की, राकेश बापटला नक्की काय झालं? पण या बाबतची माहिती अद्याप समोर आलेली नाही. (Raqesh Bapat) राकेशने रुग्णालयातून एक झलक सोशल मीडियावर शेअर केलीय. राकेशने जो व्हिडिओ शेअर केला आहे, त्याच्या हाताला ड्रिप लावलेले दिसते. २०२१ मध्ये देखील राकेशला किडनी स्टोनच्या समस्येमुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. (Raqesh Bapat)

राकेश बापटने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर एक बूमरँग व्हिडिओ शेअर केला आहे. त्याने रुग्णालयात बेडवर असतानाचा फोटो शेअर केला आहे. त्याने हाताचादेखील एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये त्याच्या हातात सलाईन लावलेले दिसत आहे.

राकेश – शमिता यांची सर्वात सुंदर जोडी आहे. दोघांची भेट एका रिॲलिटी शो बिग बॉस ओटीटीमध्ये झाली होती. हा शो करण जोहरने होस्ट केलं होतं. त्यांचे ओटीटीच्या घरामध्ये रिलेशनशिप सुरु झाले होते. शेवटी ते एकमेकांवर प्रेम करू लागले. एकमेकांसाठी आपल्या भावना जाहिर केल्या. पण घराबाहेर येताच काही दिवसांनी त्यांचा ब्रेकअप झाला.

राकेश बापटचे चित्रपट

राकेश बापट 'बिग बॉस ओटीटी १' नंतर अधिक लोकप्रिय झाला. तो चौथ्या क्रमांकावर आला. तो एक स्पर्धक म्हणून 'बिग बॉस १५' मध्ये देखील सहभागी झाला होता. आरोग्याच्या कारणास्तव त्याने शो मध्येच सोडला. राकेशला 'तुम बिन' (२००१), 'कोई मेरे दिल में है' (२००५), 'वृंदावन' (२०१६) आणि 'सविता दामोदर परांजपे' (२०१८) यासारख्या चित्रपटांसाठी ओळखले जाते. त्याने 'सात फेरे – सलोनी का सफर', 'मर्यादा: लेकिन कब तक' या टीव्ही मालिकांमध्येही काम केलं आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news