Ranveer-Alia Video : लेहेंगा घालून आलियाचे वाईट हाल, रणवीरने केलं रोमँटिक किस

Ranveer-Alia
Ranveer-Alia

पुढारी ऑनलाईन डेस्क : आलिया भट्ट-रणवीर सिंहची जोडी लवकरच 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' चित्रपटात दिसणार आहे. करण जोहरचे दिग्दर्शन असणारा हा चित्रपट रिलीज होण्यास ७ दिवस बाकी आहेत. (Ranveer-Alia Video) दरम्यान, मनीष मल्होत्राचे ब्रायडल कलेक्शन सादर करताना 'ब्रायडल कॉउचर शो' मध्ये आलिया – रणवीरेन रॅम्प वॉक केला. या शोमध्ये रणवीरने चक्क रॅम्प वॉकवर दीपिकाला रोमँटिक किस केले. शोमध्ये रणवीर सिंहने सर्वाचे मन जिंकले. पण आलियाने परिधान केलेल्या लेहेंग्यामुळे ती ट्रोल झाली. (Ranveer-Alia Video)

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

मनीष मल्होत्राच्या लेहेंग्यात आलियाचे हाल

मनीष मल्होत्राच्या शोमध्ये रणवीर सिंह व्हाईट आणि क्रीम शेरवानीमध्ये दिसला तर आलिया भट्टने ब्लॅक आणि सिल्व्हर रंगाचा लहेंगा परिधान केला होता. ब्लॅक डीप नेक ब्लाऊजमध्ये ती दिसली. नेट दुप्पटासोबत ती ब्रायडल अंदाजात दिसली. वॉक करताना तिने मीडिया कॅमेरासाठी पोझ दिले. आलिया खूप सांभाळून वॉक करत होती. ती ड्रेसमध्ये समतोल सांभाळून चालताना दिसली, ज्यामुळे तिला नेटकऱ्यांकडून ट्रोल करण्यात आले.

फॅशन इव्हेंटमध्ये रॅम्प वॉक करताना रणवीर आपली पत्नी दीपिका पादुकोणला पाहून थांबो आणि जवळ जाऊन किस करतो. हे रोमँटिक किसचे क्षण कॅमेराबद्ध झाले अन्‌ त्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागला.

(video-Viral Bhayani insta वरून साभार)

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news