गुड वाईब्स ओन्ली चित्रपट : वास्तवातील रेडिओ जॉकी आणि गायिका प्रथमच मराठी चित्रपटात | पुढारी

गुड वाईब्स ओन्ली चित्रपट : वास्तवातील रेडिओ जॉकी आणि गायिका प्रथमच मराठी चित्रपटात

पुढारी वृत्तसेवा : रेडिओ जॉकी हे सध्याच्या काळात अभिनेते-अभिनेत्रींएवढेच लोकप्रिय असतात. त्यांनाही मोठ्या संख्येने ‘फॉलोअर्स’ असतात. श्रवण अजय बने हाही एक रेडिओ जॉकी असून तो प्रथमच मराठी सिनेमाचा नायक म्हणून मोठ्या पडद्याावर झळकणार आहे. तर वास्तवात गायिका असलेली आरती केळकर ही अभिनेत्री म्हणून प्रथमच झळकणार आहे.

एक गायिका आणि एक रेडिओ जॉकी अशी नवीनच जोडी मराठी सिनेमाच्या रूपेरी पडद्याावर पाहायला प्रेक्षकांना मिळणार आहे. विशेष म्हणजे श्रवण अजय बने हा चित्रपटातही रेडिओ जॉकीच्या भूमिकेतच दिसणार आहे. तर या सिनेमात आरती केळकर ही मानसोपचारतज्ज्ञ दाखवण्यात आली आहे. सर्वस्वी निरनिराळी पार्श्वभूमी, करिअर असलेली तरुण-तरुणींची भेट या चित्रपटात पाहायला मिळणार आहे.

सोलो ट्रीप ही संकल्पना आपल्याकडे आता रुजली असून मराठी सिनेमात सोलो ट्रीपवर गेलेल्या दोन अनोळखी व्यक्तींची भेट घडते आणि मग काय होते ही ‘गुड वाईब्स ओन्ली !’ या आगामी मराठी चित्रपटाची संकल्पना आहे.

‘सर्फिंग’ हा समुद्राच्या लाटांवर केला जाणारा एक प्रकारचा खेळ आहे. ऑस्ट्रेलिया किंवा तत्सम अनेक देशांमध्ये सर्फिंग कल्चर विकसित झाले आहे. मुंबईजवळ समुद्रात प्रथमच मराठी सिनेमातून हा प्रकार प्रेक्षकांसमोर येणार आहे हेही ‘गुड वाईब्स ओन्ली !’ या सिनेमाचे वैशिष्ट्य ठरणार आहे.

अतिशय ‘फ्रेश’ जोडी रूपेरी पडद्याावर झळकते, तेव्हा मराठी तरुण प्रेक्षकांमध्ये साहजिकच उत्सुकता असते अशी जोडी पडद्यावर पाहण्याची!

सिल्क लाईट फिल्म्स या बॅनरखाली निर्माता-लेखक व दिग्दर्शक अशा तिन्ही जबाबदाऱ्या जुगल राजा यांनी स्वीकारल्या असून निवेदिता या सिनेमाच्या छायालेखक आहेत.

Back to top button