Jawan Prevue Theme : ‘जवान’चा प्रीव्ह्यू थीम सॉंग आऊट, ब्लॉकबस्टर ठरणार? (Video) | पुढारी

Jawan Prevue Theme : 'जवान'चा प्रीव्ह्यू थीम सॉंग आऊट, ब्लॉकबस्टर ठरणार? (Video)

पुढारी ऑनलाईन डेस्क : ‘पठाण’च्या ब्लॉकबस्टर यशानंतर शाहरुख खान ‘जवान’ चित्रपटाद्वारे चाहत्यांना आश्चर्यचकित करण्यासाठी सज्ज झाला आहे. हा चित्रपट सप्टेंबरमध्ये प्रदर्शित होत आहे आणि अशा परिस्थितीत निर्माते किंग खानच्या या चित्रपटाशी संबंधित अपडेट्स एकामागून एक शेअर करत आहेत. (Jawan Prevue Theme ) नुकताच ‘जवान’चा प्रिव्ह्यू शेअर करण्यात आला, जो अल्पावधीतच १०० मिलियनहून अधिक लोकांनी पाहिला. पॉवर पॅक्ड अॅक्शन सीन्सने भरलेले, आता जवान प्रिव्ह्यूचे थीम सॉंगही रिलीज झाले आहे. (Jawan Prevue Theme )

‘जवान’ची प्रीव्ह्यू थीम रिलीज

‘जवान’ पाहण्यासाठी चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. चित्रपटाच्या स्टार कास्टमध्ये नयनतारा, सान्या मल्होत्रा, विजय सेतुपती आणि प्रियामणी यांचा समावेश आहे. दीपिका पदुकोण स्पेशल ॲपिअरन्समध्ये आहे. आता चित्रपटाचे गाणे रिलीज करण्यात आले आहे. हे एक रॅप गाणे आहे.संगीत अनिरुद्ध रविचंदर यांनी दिले आहे आणि गीते राजा कुमारीने लिहिली आहेत.

तरुण चित्रपट दिग्दर्शक अॅटली कुमार यांनी प्रिव्ह्यू गाण्याच्या थीमची झलक चाहत्यांशी शेअर केली आहे. इन्स्टाग्रामवर शेअर करत अॅटलीने लिहिले, “जवान @iamsrk @gaurikhan @anirudhofficial @_gauravverma @redchilliesent #Jawan 7 सप्टेंबर रोजी हिंदी, तमिळ आणि तेलुगूमध्ये जगभरात प्रदर्शित होणारी थीम.”

अनिरुद्ध रविचंदरने प्रिव्ह्यू गाण्याची थीम देखील शेअर केली. यासोबतच त्याने संपूर्ण गाणे कुठे ऐकता येईल याची लिंकही शेअर केली आहे. हा चित्रपट हिंदी, तमिळ आणि तेलुगु भाषेत प्रदर्शित होणार आहे. रेड चिलीज एंटरटेनमेंट प्रॉडक्शन हाऊसच्या माध्यमातून ‘जवान’ चित्रपटाची निर्मिती केली जात आहे. त्याची निर्माती गौरी खान आहे. शाहरुख खान आणि एटली कुमार यांचा हा पहिलाच चित्रपट आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Atlee (@atlee47)

Back to top button