अभिनेते रवींद्र महाजनी यांचं निधन, बंद खोलीत आढळला मृतदेह

अभिनेते रवींद्र महाजनी यांचं निधन, बंद खोलीत आढळला मृतदेह

वडगाव मावळ (पुणे )   : मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते रवींद्र महाजनी यांचं निधन झालं आहे. तळेगाव अंबी येथील फ्लॅटमध्ये त्यांचा मृतदेह आढळून आला. एका बंद घरात त्यांचा मृतदेह आढळला असून या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.  तळेगाव एमआयडीसी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ते मागील ८ ते ९ महिन्यापासून आंबी (ता.मावळ) हद्दीतील एक्झर्बिया सोसायटीमध्ये एक फ्लॅटमध्ये भाड्याने राहत होते. त्यांच्यावर शस्त्रक्रिया झाली होती, दरम्यान तीन दिवसांपूर्वी अंघोळ करून कपडे बदलत असताना त्यांचा मृत्यू झाल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे अंदाज आहे.

ते घरात एकटेच होते व दरवाजा आतून बंद होता तसेच त्यांच्या घरातून वास येऊ लागल्याची माहिती शेजाऱ्यांनी पोलिसांना कळवल्यानंतर पोलिस घटनास्थळी पोहोचले तेव्हा हा प्रकार उघडकीस आला. दरम्यान एक प्रसिद्ध अभिनेत्याचा मृतदेह अशा अवस्थेत एका बंद घरात आढळल्याने चित्रपट क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे. त्यांच्या पश्चात मुलगा गश्मिर महाजनी आहे. गश्मिरदेखील अभिनय क्षेत्रात कार्यरत आहे.

पानिपत सिनेमा ठरला अखेरचा !

2019 मध्ये आलेल्या 'पानिपत' सिनेमात महाजनी अखेरचे दिसले होते. या सिनेमात त्यांनी मल्हारराव होळकर यांची भूमिका साकारली होती.

रुबाबदार अभिनेता !

मराठी सिनेमातील रुबाबदार अभिनेत्यांमध्ये रवींद्र महाजनी यांचं नाव सगळ्यात वर आहे. 'झुंज' या मराठी सिनेमातून त्यांच्या रूपाने मराठी सिनेमाला नवा नायक मिळाला.  त्यानंतर लक्ष्मी, देवता, मुंबईचा फौजदार या सिनेमांनी लोकप्रियता मिळवली.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news