शहरात पाच दिवस हलक्या पावसाची शक्यता ; शहरात मान्सून सक्रिय झाल्याचा शास्त्रज्ञांचा दावा | पुढारी

शहरात पाच दिवस हलक्या पावसाची शक्यता ; शहरात मान्सून सक्रिय झाल्याचा शास्त्रज्ञांचा दावा

पुणे : शहरात थांबलेला मान्सून अखेर पुन्हा सक्रिय झाल्याचा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तवला असून, शहरात आगामी पाच दिवस हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. शहर व घाटमाथ्यासह संपूर्ण जिल्ह्यात मान्सून सक्रिय झाल्याचा अंदाज हवामान विभागाचे प्रमुख अनुपम कश्यपी यांनी व्यक्त केला आहे, त्यामुळे 15 ते 20 जुलै या दरम्यान शहरात चांगला पाऊस होईल, तसेच घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा अंदाज दिल्याने संपूर्ण जिल्ह्यात मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस होईल.

घाटमाथ्याला ऑरेंज अलर्ट
पुणे वेधशाळेने घाटमाथ्याला ऑरेंज अलर्ट दिला असून, तेथे 17 व 18 रोजी अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे 17 व 18 रोजी शहरातही चांगला पाऊस होईल, अशी शक्यता आहे.

हेही वाचा : 

पुण्यातील 28 खेळाडूंना ‘शिवछत्रपती’ क्रीडा पुरस्कार

West Indies vs India 1st Test LIVE :  तिसऱ्या दिवशी उपाहारापर्यंत भारताची धावसंख्या ४ बाद ४०० 

Back to top button