RARKPK : कॉमेडी ते रोमान्सने भरपूर आलिया-रणवीरच्या चित्रपटाचा ट्रेलर

RARKPK : कॉमेडी ते रोमान्सने भरपूर आलिया-रणवीरच्या चित्रपटाचा ट्रेलर

पुढारी ऑनलाईन डेस्क : आलिया भट्ट-रणवीर सिंह स्टारर 'रॉकी और रानी की प्रेम कहानी'चा ट्रेलर रिलीज झालाय. करण जौहर ७ वर्षांनंतर या चित्रपटाचे दिग्दर्शन करतोय. चित्रपटामध्ये आलिया भट्ट-रणवीर सिंह यांची जोडी पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर रोमान्स करताना दिसणार आहे. निर्मात्यांनी ट्रेलर रिलीज केला आहे. (RARKPK )

कभी खुशी कभी गम… कभी अलविदा न कहना…जुग-जुग जियो नंतर एकदा पुन्हा करण जौहर फॅमिली ड्रामासोबत परतला आहे. रॉकी और रानीच्या धमाकेदार ट्रेलरनंतर बॉक्स ऑफिस हिट देण्यासाठी चित्रपट सज्ज आहे. ट्रेलरमध्ये बंगाली आणि पंजाबी दोन कुटुंबातील संस्कृतीमधील संघर्ष दाखवण्यात आला आहे. चित्रपटाच्या ट्रेलरची सुरुवात आलिया-रणबीरच्या भांडणाने सुरु होते.

काही मिनिटांच्या ट्रेलरमध्ये कॉमेडी, इमोशनल ड्रामा, ब्रेकअप, रोमान्स सर्व पाहायला मिळेल. रणवीर-आलियासोबत जया बच्चन, धर्मेंद्र आणि शबाना आजमी तुम्हाला आकर्षित करण्यासाठी यशस्वी ठरतील. त्याची ट्रेलरची भव्यतेने अंदाज लावू शकतो की, किती एंटरटेनिंग असेल.

हेदेखील वाचा-

 

View this post on Instagram

 

A post shared by Karan Johar (@karanjohar)

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news