

पुढारी ऑनलाईन डेस्क : अत्यंत प्रतिभावान अभिनेता आणि होस्ट अपारशक्ती खुराणा हा अलीकडेच हिमाचल प्रदेशच्या ट्रान्स-हिमालयीन राज्यामध्ये वसलेल्या स्पिटी व्हॅलीमध्ये सुंदर अशा प्रदेशात तो कार राईडचा आनंद घेताना दिसला. त्याचा हा अफलातून प्रवास त्याने त्याच्या सोशल मीडियावर शेअर केला आहे. (Aparshakti Khurana) अभिनेत्याने चाहत्यांना इन्स्टाग्रामवर त्याचा मित्र आणि शेफ रणवीर ब्रारसह त्याच्या स्पिती भेटीची एक झलक दिली आहे. त्याने विनोदीपणे पोस्टला कॅप्शन देऊन ही खास पोस्ट शेयर केली आहे. (Aparshakti Khurana)
अपारशक्तीचा स्पिटी व्हॅलीमधून केलेला प्रवास हा निसर्गातील अनेक सुंदर गोष्टीचं नयनरम्य दर्शन घडवतो. स्थानिक खाद्यपदार्थ आणि सांस्कृतिक विविधता यांचा मनमोहक शोध घेताना हा प्रवास त्याला नक्कीच काहीतरी खास देऊन जातो. हिमालयातील सुंदर अनुभवाबद्दल बोलताना अपारशक्तीने शेअर केले " अरे देवा! मी स्पिटीला गेलो आणि मी थक्क झालो. हे ठिकाण आणि इथलं वातावरण कमाल आहे. माझ्या बकेट लिस्ट मधलं ठिकाण फिरलो.
अभिनेता अपारशक्ती खुराना अतुल सभरवाल यांच्या बर्लिन नावाच्या चित्रपटात दिसणार. हिट हॉरर-कॉमेडीचा बहुप्रतिक्षित सिक्वेल असलेल्या स्त्री २ साठी देखील शूट करणार आहे.