ज्येष्ठ अभिनेत्री आशा नाडकर्णी यांचे निधन | पुढारी

ज्येष्ठ अभिनेत्री आशा नाडकर्णी यांचे निधन

पुणे : मूळच्या पुण्याच्या असलेल्या आशा नाडकर्णी यांचे नुकतेच दक्षिण मुंबईतील त्यांच्या निवासस्थानी निधन झाले. गेली अनेक वर्षे त्या मूत्रपिंडाच्या आजाराने त्रस्त होत्या. त्या ८० वर्षांच्या होत्या. त्यांच्या मागे मुलगा, सून आणि नातू असा परिवार आहे. त्यांच्या मुलाने त्यांच्या निधनाची बातमी माध्यमांना दिली. वयाच्या १५ व्या वर्षांपासून त्यांनी अभिनयाला सुरुवात केली.

आशा नाडकर्णी १९५७ मध्ये आपल्या कुटुंबासह मुंबईत स्थायिक झाल्या. मुंबईत आल्यानंतर त्यांनी हिंदी चित्रपटात काम करायला सुरुवात केली. प्रसिद्ध दिग्दर्शक व्ही. शांताराम यांनी त्यांना आपल्या ‘मौसी’ या चित्रपटात पहिली संधी दिली होती. व्ही. शांताराम यांच्या नवरंग, गुरू और चेला, चिराग, फरिश्ता, श्रीमानजी, दिल और मोहब्बत, अलबेला मस्ताना अशा विविध चित्रपटांतून त्यांनी काम केले. मराठीतही श्रीमान बाळासाहेब, क्षण आला भाग्याचा, मानला तर देव सारख्या चित्रपटांतून त्यांनी महत्वाच्या भूमिका केल्या.

हेही वाचा

नाशिक : २५ लाखांच्या खंडणीसाठी प्राध्यापकाचे अपहरण, सहा जणांविरुद्ध गुन्हा

सिंधुदुर्गात दमदार पाऊस! सावडाव धबधबा प्रवाहित

२५ वर्षाची सेवा फळाला; नेवाशातील काळे दाम्पत्यास महापूजेचा मान

Back to top button