Gadar 2 : २२ वर्षांनंतर तारा सिंह- सकीनाचा रोमान्स, चाहते झाले फिदा | पुढारी

Gadar 2 : २२ वर्षांनंतर तारा सिंह- सकीनाचा रोमान्स, चाहते झाले फिदा

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड अभिनेता सनी देओल आणि अमिषा पटेल ‘गदर २’ ( Gadar 2 ) चित्रपटामुळे चर्चेत आले आहेत. हा चित्रपट लवकरच चाहत्यांच्या भेटीस येत असून त्यातील पहिले गाणे रिलीज झाले आहे. बहुचर्चित ‘उड जा काले कावा’ हे गाणे रिलीज होताच त्याने पुन्हा एकदा प्रेक्षकांना वेड लावले आहे.

सनी आणि अमिषा यांच्या आधीच्या ‘गदर’ चित्रपटातील गाण्याचे बोल आहेत. मात्र, चित्रपटातील गाण्यात वेगवेगळे सीन दाखवण्यात आले आहेत. आधीच्या चित्रपटात तारा त्याच्या मुलाला घेवून सकीनाला शोधताना दिसत होता. मात्र, यावेळच्या ‘गदर २’ ( Gadar 2 ) मध्ये तारा आणि सकीना रोमान्ससह गाणे गाताना दिसत आहेत. यावेळी खास करून ता सकीनासाठी गाणे गात आहे. तर सकीना त्याच्याकडे एकटर पाहताना दिसतेय. शेवटी दोघेजण डान्स करताना दिसत आहेत. २२ वर्षानंतरही दोघांच्या चेहऱ्यावर चमक आहे. या गाण्याचा व्हिडिओ सनीच्या इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये ‘Phir se hogi pyaar ki barsaat, #UddJaaKaaleKaava ki dhun ke saath! ❤️’ अशी लिहिली आहे.

हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर होताच चाहत्यांनी गाण्याचे भरभरून कौतुक केलं आहे. दरम्यान काही युजर्सने लिहिले आहे की, ‘कदाचित हे एकमेव गाणे आहे जे २२ वर्षांनंतर रिक्रिएट होऊनही तीच भावना पाहत येत आहे’, ‘धन्यवाद ‘गदर २”. ‘गाणे चांगले असून गाण्यात रिमेक नाही, किसिंग नाही, ओव्हर अॅक्टिंग नाही, फक्त शुद्ध मेलडी’, ‘केवळ ९० च्या दशकातील अभिनय साकारलाय’. यासारख्या अनेक कॉमेन्टस केल्या आहेत. ‘गदर २’ हा चित्रपट ११ ऑगस्ट २०२३ रोजी रिलीज होणार आहे. यामुळे चाहत्याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

हेही वाचा : 

 

View this post on Instagram

 

A post shared by Zee Music Company (@zeemusiccompany)

 

View this post on Instagram

 

A post shared by Sunny Deol (@iamsunnydeol)

Back to top button