Salman Khan : आमच्या भाईची माफी मागितली नाही, सलमानला गँगस्टर गोल्डीची पुन्हा धमकी | पुढारी

Salman Khan : आमच्या भाईची माफी मागितली नाही, सलमानला गँगस्टर गोल्डीची पुन्हा धमकी

पुढारी ऑनलाईन डेस्क : गँगस्टर गोल्डी बराडने पुन्हा एकदा सलमान खानला जीवे मारण्याची धमकी दिलीय. सलमान खान टार्गेटवर असल्याचे त्याने म्हटलय. पंजाबी सिंगर सिद्धू मूसेवालाच्या हत्येप्रकरणी वॉन्टेड गोल्डीने एका इंग्रजी वेबसाईटला दिलेल्या माहितीनुसार, हा दावा करण्यात आला आहे की, हे पहिल्यांदा घडलेले नाही, जेव्हा गँगस्टरने सलमान खान हिट लिस्टवर असल्याचे म्हटले होते. काही महिन्यांआधी सलमानने गोल्डी बराडकडून मिळालेल्या धमकीने भरलेला मेल मिळाल्याची माहिती मुंबई पोलिसांनी दिली होती.

बिश्नोई गँगचा सदस्य गोल्डी बराडने सांगितलं की, सलमान खान आमच्या हिट लिस्टवर आहे. भाईसाहेब (लॉरेंस बिश्नोई) ने सलमानला माफी मागायला सांगितले होते. पण, त्याने माफी मागितलेली नाही.

काही महिन्यांआधी पंजाबच्या जेलमध्ये बंद गँगस्टर लॉरेंस बिश्नोईने एक मुलाखत दिली होती. त्यामध्ये म्हटलं होतं की- त्याच्या आयुष्यातील उद्देश सलमान खानला मारणे आहे.

Back to top button