छोट्या बयोची मोठी स्वप्नं : सुरुची अडारकर दिसणार शिक्षिकेच्या भूमिकेत

सुरुची अडारकर
सुरुची अडारकर
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : शिक्षणासाठीची जिद्द आणि स्वप्नांची ओढ, असा वेगळा विषय हाताळत 'छोट्या बयोची मोठ्ठी स्वप्नं' ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली. 'छोट्या बायोची मोठी स्वप्नं' या मालिकेत आपल्याला बायोच्या शिक्षणाचा प्रवास पाहायला मिळतो आहे. बायोच्या शिक्षणाच्या जिद्दीचा अनोखा प्रवास या मालिकेत आपल्याला पाहायला मिळतो आहे. आता मालिकेत एन्ट्री होणार आहे सुरुची अडारकर हिची. अनू देसाई असे तिच्या व्यक्तिरेखेचे नाव असून ती शिक्षिकेच्या भूमिकेतून प्रेक्षकांसमोर येते आहे. ती पहिल्यांदाच शिक्षिकेच्या भूमिकेत टेलिव्हिजनवर येते आहे. भरपूर अभ्यास करून डॉक्टर व्हायचं स्वप्न बघणारी बयो आणि तिची आई भारती यांच्या आयुष्यात शुभंकरच्या येण्याने चांगले दिवस आणले. पण आता भारतीच्या जाण्याने बयोवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. शिवाय शुभंकरदेखील बायोसोबत काही काळ नव्हता. या धक्क्यांतून बयो कशी सावरेल, तिला तिची स्वप्नं पूर्ण करता येतील का; हे पाहणे आता उत्सुकतेचे आहे.

आता शिक्षिका अनू देसाईच्या येण्याने बयोच्या आयुष्यात काय बदल होतील, हे पाहायला मिळेल. बयोचे डॉक्टर होण्याचे स्वप्न आता कसे पूर्ण होईल. तिचा सगळ्यांत मोठा आधार तिच्यासोबत नसणार आहे आणि आता शुभंकर तिची काळजी कशी घेईल हेही पाहता येईल. आता शिक्षिका अनू देसाईच्या येण्याने बयोच्या आयुष्यात एक आशेचा किरण आला असून तिच्या येण्याने बयोला कशी मदत होईल, हे मालिकेतून प्रेक्षकांना पाहायला मिळेल.
सुरुचीच्या चाहत्यांसाठी तिला टेलिव्हिजनवर पुन्हा पाहणे हे मजेशीर असणार आहे.

मालिकेत तिची एन्ट्री झाली आहे आणि आता बयोच्या आयुष्यातील हे वळण तिला पुढे कसे मदत करेल, हे पाहायला मिळेल. सुरुचीच्या नव्या पेहेरावाची चर्चा पाहायला मिळते आहे. शिक्षिकेच्या भूमिकेत ती पहिल्यांदा प्रेक्षकांसमोर दिसते आहे.

बयोचे डॉक्टर व्हायचे स्वप्न कसे पूर्ण होणार, हे पाहणे उत्सुकतेचे असेल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news