‘Emergency’ Teaser Out: कंगनाच्या ‘Emergency’ चित्रपटाचा टीझर रिलीज; ‘या’ दिवशी होणार प्रदर्शित | पुढारी

'Emergency' Teaser Out: कंगनाच्या 'Emergency' चित्रपटाचा टीझर रिलीज; 'या' दिवशी होणार प्रदर्शित

पुढारी ऑनलाईन डेस्क: अभिनेत्री आणि दिग्दर्शक कंगना राणौतच्या बहुप्रतीक्षित ‘इमर्जन्सी’ (Emergency) चित्रपटाचा आज (दि.२५ जून) टीझर रिलीज झाला असून, लवकरच तो देशभरातील चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. अशी माहिती कंगना हिने तिच्या ट्विटरवरून दिली आहे. तिने ट्विटरवरून या (‘Emergency’ Teaser Out) चित्रपटाचा टीझर व्हिडिओ आणि संदेश शेअर केला आहे.

अभिनेत्री, दिग्दर्शक कंगना राणौतने ट्विटरवर म्हटले आहे की, आज (दि.२५ जून) आणीबाणीचा ४८ वा वर्धापनदिन असून, यानिमित्त ‘इमर्जन्सी’ (Emergency) या चित्रपटाचा टीझर रिलीज होत आहे. तसेच २४ नोव्हेंबर, २०२३ रोजी ही घटना (‘Emergency’ Teaser Out) पुन्हा एकदा जिवंत होईल, असे देखील कंगना हिने ट्विटरवर म्हटले आहे.

कंगनाच्या ‘इमर्जन्सी’ (Emergency) या चित्रपटात ती स्वत: दिवंगत माजी पंतप्रधान ‘इंदिरा गांधी’यांची प्रमुख भूमिका साकारणार आहे. ‘धाकड’नंतर आता कंगना रणौत पुन्हा एकदा एका दमदार व्यक्तिरेखेत दिसणार आहे. या चित्रपटात कंगना व्यतिरिक्त अनुपम खेर, श्रेयस तळपदे हे देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. कंगनाच्या या मोस्ट अवेटेड चित्रपटाची कथा २५ जून, १९७५ ते २१ मार्च, १९७७ या काळात देशभरात आलेल्या आणीबाणीवर (‘Emergency’ Teaser Out) आधारित आहे.

हेही वाचा:

Back to top button