Dholkichya Talavar : परततोय लावणीचा महामंच “ढोलकीच्या तालावर” लवकरच

dholkichya talawar
dholkichya talawar
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : 'ढोलकीच्या तालावर' १ जुलै पासून शनि आणि रवि रात्री ९.०० वा कलर्स मराठीवर भेटीला येणार आहेत. अष्टपैलू अभिनेत्री क्रांती रेडकर, सुप्रसिध्द निर्माते, दिग्दर्शक आणि लेखक अभिजीत पानसे आणि नृत्य दिग्दर्शक आशिष पाटील या पर्वाचे परीक्षक असणार आहेत. (Dholkichya Talavar) कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणार आहे बिग बॉस मराठी सिझन चौथाचा महविजेता आणि आपल्या सगळ्यांचा लाडका अक्षय केळकर. (Dholkichya Talavar)

अभिनेत्री क्रांती रेडकर म्हणाली, मी खूप उत्सुक आहे मी कार्यक्रमाचा भाग आहे. कारण कुठेतरी नृत्य ही माझ्या हृदयाच्या खूप जवळची अशी गोष्ट आहे. त्यामुळे येणारे जे स्पर्धक आहेत त्यांची तयारी बघण्यात आणि त्यांच्याबरोबरचा प्रवास त्यांच्यासोबत साध्य करण्यात माझा कल जास्त आहे. मी जरी परीक्षकाच्या भूमिकेत असले तरीदेखील मी त्यांची सपोर्टर असेन. त्या खुर्चीवर मला एक माणूस म्हणून बसायला जास्त आवडेल जेव्हा त्यांना माझी गरज असेल तेव्हा मी तिथे कायम असेन."

नृत्य दिगदर्शक आशिष पाटील म्हणाला, एक सामान्य माणूस ते इथपर्यंतचा प्रवास खूपच सुंदर आणि खूप काही शिकवणारा होता आणि अजूनही आहे. एक कलाकार, मग एक स्पर्धक, मग कोरिओग्राफर, ते आज परीक्षक हा प्रवास हा फक्त एक स्वप्नवत क्षण आहे. लोककला प्रकार (लावणी) ला गेले १८ वर्षांपासून मी जपून ठेवले आहे जितका आनंद तो सादर करताना होतो तितकाच परीक्षकाच्या खुर्चीत बसून देखील होतो आहे.

निर्माते, दिगदर्शक आणि लेखक, अभिजीत पानसे म्हणाले, "जेव्हा मला या कार्यक्रमाबद्दल विचारणा झाली तेव्हा मला गंमत वाटली कारण माझा शास्त्रीय नृत्याचा काही अभ्यास नाही. नृत्याशी माझा संबंध हा फक्त मिरवणुकी पर्यंतच. मला सांगण्यात आले एका दिग्दर्शकाच्या दृष्टिकोनातून तुम्हाला कसं वाटलं त्याच्यासाठी आम्हाला एक दिग्दर्शक हवा आहे. त्यामुळे मी स्वतः खूप उत्सुक आहे परीक्षण करण्यासाठी…टेलिव्हिजन कार्यक्रमामध्ये अश्याप्रकरचे परीक्षण मी आयुष्यात पहिल्यांदाच करणार आहे.

कार्यक्रमाचा सूत्रसंचालक अक्षय केळकर म्हणाला, मला वाटतं कलर्स मराठीशी माझं वेगळंच एक नातं आहे. जसे चाकरमानी कोकणासाठी आसुसलेले असतात तसा मी ही माझ्या घरात म्हणजे मराठी माणसांमध्ये ओळख व्हावी यासाठी आसुसलेलो. आणि मला बिग बॉस मराठीची संधी मिळाली आणि एक वर्तुळ पूर्ण झाल्यासारखं वाटलं. कलर्स मराठीने माझ्या portfolio मध्ये दोन नवीन शब्द भरले – रिॲलिटी शो आणि दुसरा म्हणजे Host.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news