Emraan Hashmi : अभिनेता इम्रान हाश्मी झळकणार साऊथ सिनेमात | पुढारी

Emraan Hashmi : अभिनेता इम्रान हाश्मी झळकणार साऊथ सिनेमात

पुढारी ऑनलाईन डेस्क : दिग्दर्शक सुजीतचा गँगस्टर ड्रामा ‘ओजी’ची घोषणा झाल्यापासून तो चर्चेत आहे. बहुप्रतीक्षित आगामी चित्रपटांपैकी एक ‘OG’ मध्ये पॉवर स्टार पवन कल्याण मुख्य भूमिकेत आहे. (Emraan Hashmi) चित्रपटाचे शूटिंग सध्या प्रगतीपथावर असताना आणि त्यातील काही भाग मुंबईत शूट करण्यात आला आहे. निर्माते आता चित्रपटाच्या शूट शेड्यूलला सुरुवात करण्यासाठी हैदराबादला जाणार असल्याचे समजते. या चित्रपटाचा एक मोठा अपडेट म्हणून समोर येत असून अभिनेता इमरान हाश्मी या चित्रपटात झळकणार असल्याची माहिती समोर आलीय. (Emraan Hashmi)

तेलुगू ड्रामा चित्रपटात इम्रान हाश्मी नेमेसिसच्या भूमिकेत दिसणार आहे. एक महत्त्वपूर्ण भूमिका तो या चित्रपटात साकारणार असल्याचं कळतंय. या चित्रपटात इम्रान हाश्मी एक भूमिका साकारणार आहे आणि भारतभरातील सिनेप्रेमींसाठी ही अनोखी पर्वणी असणार आहे.
तेलुगू चित्रपटसृष्टीत पदार्पण करण्याबाबत बोलताना इम्रान हाश्मी सांगतो, “दक्षिण भारतीय चित्रपट इंडस्ट्रीत ‘OG’ या चित्रपटाद्वारे या नव्या प्रवासाला मी सुरुवात करत आहे. त्यासाठी मी उत्सुक आहे. चित्रपटाची स्क्रिप्ट आकर्षक आहे आणि ती मला आव्हानात्मक भूमिका देते. मी पवन कल्याण सर, सुजीत, दानय्या सर आणि टीमसोबत काम करण्यास उत्सुक आहे, मला विश्वास आहे की आम्ही प्रेक्षकांसाठी एक संस्मरणीय सिनेमॅटिक अनुभव तयार करू.”

अगदी अलीकडेच, निर्मात्यांनी तमिळ अभिनेत्री श्रीया रेड्डी या चित्रपटात मुख्य भूमिका साकारल्याबद्दल अधिकृत घोषणा केली. थमन एसच्या संगीतासह, ‘OG’ ची निर्मिती DVV दानय्या, सुजीत यांनी DVV एंटरटेनमेंट्स बॅनरखाली लिखित आणि दिग्दर्शित केली आहे. या चित्रपटात ज्येष्ठ अभिनेते प्रकाश राज यांचीही प्रमुख भूमिका साकारणार आहेत.

Back to top button