Bharatanatyam Guru Sri Ganesan : भरतनाट्यम गुरु गणेशन काळाच्या पडद्याआड, नृत्यानंतर स्टेजवर कोसळले | पुढारी

Bharatanatyam Guru Sri Ganesan : भरतनाट्यम गुरु गणेशन काळाच्या पडद्याआड, नृत्यानंतर स्टेजवर कोसळले

पुढारी ऑनलाईन डेस्क : मलयेशियातील प्रमुख भरतनाट्यम नर्तक गणेशन शुक्रवारी ओडिशाची राजधानी भुवनेश्वरमध्ये एका सांस्कृतिक समारोहानंतर नृत्य केल्यानंतर स्टेजवर कोसळले. (Bharatanatyam Guru Sri Ganesan) यानंतर त्यांना रुग्णालयात नेण्यात आले, तेथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. (Bharatanatyam Guru Sri Ganesan)

श्री गणेशन मलयेशियाचे नागरिक होते. ते क्वालालंपूर येथील श्री गणेशालयाचे संचालकही होते. गणेशन हे भुवनेश्वर येथे भंजा कला मंडपात तीन दिवसीय देवदासी नृत्य कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आले होते. सांस्कृतिक संघटनेच्या कार्यक्रमात त्यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार होते. शुक्रवारी कार्यक्रमाचा शेवटचा दिवस होता.

प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, , ६० वर्षांचे श्री गणेशन यांनी नृत्य केलं. नंतर दीपप्रज्वलन करताना स्टेजवर कोसळले. एका अधिकारीने सांगितले की, त्यांना तत्काळ भुवनेश्वरमधील कॅपिटल रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. कॅपिटल रुग्णालयात एका डॉक्टराने सांगितलं की, श्री गणेशन यांचा मृत्यू हृदयविकाराचा झटका आल्याने झाला असम्याची शक्यता आहे. शनिवारी सकाळी त्यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन केलं जाईल.

Back to top button