Oh My God 2 : या दिवशी येणार ‘ओह माय गॉड २’, अक्षयचा नवा लूक रिलीज

akshay kumar
akshay kumar

पुढारी ऑनलाईन डेस्क : अक्षय कुमारचा सुपरहिट चित्रपट 'ओह माय गॉड' च्या फॅन्ससाठी एक गुड न्यूज आहे. (Oh My God 2) मोस्ट अवेटेड चित्रपटाचा सीक्वल 'ओह माय गॉड २' आता चित्रपटगृहात रिलीज होणार आहे. अक्षयने सोशल मीडियावर चित्रपटाचे एक पोस्टर शेअर केले आहे. सोबतच ओह माय गॉडच्या रिलीज डेटचीही घोषणा करण्यात आलीय. चित्रपटामध्ये पंकज त्रिपाठी आणि यामी गौतमदेखील मुख्य भूमिकेत आहेत. (Oh My God 2)

चित्रपटगृहात रिलीज होणार 'ओह माय गॉड २'

ओह माय गॉडच्या यशानंतर ११ वर्षांनी अक्षय कुमार ओह माय गॉड २ सोबत प्रेक्षकांचे मनोरंजन करायला वापस येत आहे. पोस्ट शेअर करत अक्षय कुमारने कॅप्शनमध्ये लिहिलं- येत आहोत आम्ही, तुम्ही पण या, ११ ऑगस्टला चित्रपटगृहात. त्याने केलेल्या पोस्टमध्ये अक्षय कुमार, भगवान शिवच्य़ा गेटअपमध्ये दिसत आहे.

यामी गौतमीदेखील दिसणार

मागील काही दिवसांत अक्षय कुमारचा हा चित्रपट ओटीटीच्या माध्यमातून प्रेक्षकांपर्यंत पोहोचणार आहे. पण, आता स्पष्ट झालं आहे की, हा चित्रपटगृहात रिलीज होणार आहे. चित्रपटामध्ये पंकज त्रिपाठी आणि यामी गौतम मुख्य भूमिकेत आहेत. दिग्दर्शक अमित रायने केलं आहे. ज्यामध्ये निर्माते अश्विन वर्दे, वायकॉम १८ आणि जिओ स्टुडिओ आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Akshay Kumar (@akshaykumar)

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news