Deepika Padukone : एस एस राजमौलींचा मोठा धमाका! दीपिकासोबत हे कलाकार SSMB29 मध्ये असणार

deepika padukone
deepika padukone

पुढारी ऑनलाईन डेस्क : साऊथचे प्रसिद्ध दिग्दर्शक एस एस राजामौली (SS Rajamouli) आरआरआर नंतर आणखी एक चित्रपट आणणार आहेत. (Deepika Padukone) साऊथ स्टार महेश बाबू आणि बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोन या कलाकारांना सोबत घेऊन SSMB29 हा चित्रपट करणार असल्याची माहिती मिळतेय. (Deepika Padukone)

सुपरस्टार महेश बाबूने तमिळ, तेलुगू, कन्नड आणि मल्याळम भाषेत अनेक चित्रपट केले आहेत. महेश बाबूने शेअर केलेल्या पोस्टनुसार, हा चित्रपट १३ जानेवारी २०२४ रोजी रिलीज होईल.

महेश बाबूच्या फॅनक्लबच्य़ा एका ट्विटमध्ये म्हटलंय-भारतीय सिनेमातील सर्वात मोठा चित्रपट SSMB29 येणार आहे. एस एस राजामौली या चित्रपटाचे दिग्दर्शन करतील. मुख्य भूमिकेत महेश बाबू -दीपिका पादुकोण असून चित्रपटामध्ये खलनायकाच्या भूमिकेत आमिर खान असेल.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news