72 Hoorain : दहशतवादाची नवी पाने उलगडणार ‘७२ हुरे’

72 Hoorain
72 Hoorain
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलीवूडमध्ये दहशतवादावर एकानंतर एक नवे चित्रपट रिलीज होत आहेत. 'द कश्मीर फाईल्स' आणि 'द केरल स्टोरी' नंतर एक नव्या चित्रपटाची चर्चा सुरु झाली. त्या चित्रपटाचे नाव आहे- 72 Hoorain. या चित्रपटाचा पहिला लूक समोर आला आहे. पहिल्याच लूकनंतर वाद निर्माण झाला आहे. सोशल मीडियावर लोक चित्रपटामुळे भडकलेले दिसत आहेत आणि या चित्रपटाच्या रिलीजवरून विरोध करत आहेत. (72 Hoorain)

 

View this post on Instagram

 

A post shared by Taran Adarsh (@taranadarsh)

सुरुवातीच्या लूकवरून समजते की, कशा प्रकारे दहशतवादी आपल्या दहशतवादी प्लॅन्समध्ये महिलांचा वापर करून दहशतवाद पसरवतात. त्याचबरोबर सांगण्यात आले आहे की, कशाप्रकारे महिलांच्या जाळ्यात अडकून लोक फसतात. चित्रपटामध्ये पहिल्या लूकमध्ये कसाब, ओसामा बिन लादेन, याकुब मेनन, मसूद अजहर आणि हाफिज सईद यांची झलक पाहायला मिळेल. त्याचबरोबर, भारतात झालेल्या दहशतवादी घटनांची झलक दिसत आहे. या छोट्याशा टीझर व्हिडिओमध्ये ७२ तरुणींचा या घटनेत कशाप्रकारे वापर केला जातो, हे दाखवण्याचा प्रयत्ने केला गेला आहे.

७ जुलैला रिलीज होणार

७२ हुरे ७ जुलैला रिलीज होणार आहे. या चित्रपटामध्ये नव्या अभिनेत्यांना संधी मिळालीय.

हेदेखील वाचा-

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news