Malaika Arora's pregnancy : मलायकाच्या गरोदरपणाबाबत अर्जुन कपूरने सोडले मौन, म्हणाला... | पुढारी

Malaika Arora's pregnancy : मलायकाच्या गरोदरपणाबाबत अर्जुन कपूरने सोडले मौन, म्हणाला...

पुढारी ऑनलाईन डेस्क : अर्जुन कपूरने गेल्या वर्षी मलायका अरोरा गर्भवती असल्याच्या अफवा फेटाळून लावल्या होत्या. आता अर्जुन कपूर माध्यमातील ‘क्लिक बेट’ कल्चरवर बोलला आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये, अभिनेता अर्जुन कपूरने मलायका अरोरा लवकरचं त्यांच्या मुलाचे स्वागत करणार असल्याचा दावा एका लेखामधून करण्यात आला होता. याबाबत अर्जुन कपूरने संबंधितांना जाबही विचारला होता. (Malaika Arora’s pregnancy)

नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीदरम्यान अर्जुनला या जोडप्याबद्दल सतत येत असलेल्या खोडसाळ मीडिया रिपोर्ट्सबद्दल विचारण्यात आले. अभिनेत्याने सांगितले की, आजची माध्यमांतील क्लिकबेट संस्कृती याला कारणीभूत आहे, तसेच त्यासाठी मीडियाही जबाबदार आहे. २०२२ मधील एका बातम्यांच्या लेखाचा स्क्रीनशॉट शेअर करत अर्जुनने लिहिले होते की, “अशा बातम्या तुम्ही किती असंवेदनशील, अनौपचारिक आहात हे स्पष्ट करतात. तुम्ही पूर्णपणे अनैतिकरित्या अशा बातम्या देत आहात. आमच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल माहिती न घेता बोलण्याचे धाडस करु नका.” (Malaika Arora’s pregnancy)

लोक विसरतात सेलेब्रिटी देखील माणसं असतात (Malaika Arora’s pregnancy)

माध्यमांतील क्लिकबेट संस्कृती नकारात्मकता अधिक पसरवत आहे. मला वाटते की, नकारात्मकतेून लोकांचे लक्ष वेधून घेणे सोपे आहे. कारण ते काही काळापासून तयार होत आहे. ऐका, आम्ही अभिनेते आहोत, आमचे वैयक्तिक आयुष्य नेहमीच खासगी नसते. परंतु, मला वाटते की प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्ही तुमच्या सर्वांवर (पत्रकार) अवलंबून आहोत. (Malaika Arora’s pregnancy)

हेही वाचलंत का?

Back to top button