Asur 2 : मास्टर पिस वेबसीरिज; अरशद वारसीच्या 'असुर २' वर मीम्सचा पाऊस | पुढारी

Asur 2 : मास्टर पिस वेबसीरिज; अरशद वारसीच्या 'असुर २' वर मीम्सचा पाऊस

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड अभिनेता अरशद वारसीची गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असणारी ‘असुर २’ ( Asur 2 ) ही वेबसीरिज नुकतेच रिलीज झाली आहे. एकिकडे हा चित्रपट रिलीज होताच चाहत्याच्या पसंतीस उतरला आहे. तर दुसरीकडे चित्रपटाचे कौतुक करताना टविट्टरवर मिम्सचा पाऊस पडलाय. चित्रपटातील सस्पेंस, थ्रिलर, अॅक्शन सीनसह भारदस्त भूमिकांनी चाहत्यांना भारावून सोडले आहे.

अभिनेता अरशद वारसीचा ‘असुर’ चित्रपटाचा पहिला भाग खूपच गाजला. यानंतर चाहते त्याचा दुसऱ्या भागाची आतुरतेने वाट पाहात होते. आज या ‘असुर २’ ( Asur 2 ) ही वेबसीरिज सर्वत्र रिलीज झाली. या चित्रपटात अरशद वारसीसोबत बरुण सोबती, रिद्धी डोगरा, मियांग चेंग, गौरव अरोजा, अनुप्रिया गोयनका या कलाकारंनी भूमिका साकारली आहे.

‘असुर २’ पाहून प्रेक्षकांनी चित्रपटाचे भऱभरून कौतुक करत कॉमेन्टचा पाऊस पाडलाय. यात युजर्सने ‘वेबसीरिज मास्टर पिस आहे’ असे म्हटले आहे. तर दुसऱ्या एका युजरने ‘या सीरिजचे पुढचे भाग लवकर प्रदर्शित करा’ असे म्हटले आहे. ‘असुर २’ या वेबसीरिजला चाहत्याचा संमित्र प्रतिसाद मिळाला आहे. तर टविटरवर ट्रेंन्डवर मीम्सचा पाऊस पडत आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन ओनी सेन यांनी केले आहे.

हेही वाचा : 

Back to top button