अनुष्का शर्मा आणि साक्षी धोनी निघाल्या बालपणीच्या मैत्रिणी; पहा फोटो | Anushka Sharma And Sakshi Dhoni Childhood Friend | पुढारी

अनुष्का शर्मा आणि साक्षी धोनी निघाल्या बालपणीच्या मैत्रिणी; पहा फोटो | Anushka Sharma And Sakshi Dhoni Childhood Friend

पुढारी ऑनलाईन डेस्क : आयपीएलच्या प्रत्येक सामन्यात चाहत्यांसह टीमचे मालक आणि खेळाडुंच्या पत्नी आपापल्या संघाना पाठिंबा देताना आपण पाहिले आहे. धोनीच्या चेन्नई संघाचा सामना असेल तेव्हा त्यांची पत्नी साक्षी व त्याची मुलगी पाठिंबा देताना दिसत होती. दुसरीकडे बेंगलोरच्या संघात विराट कोहली असल्याने त्याची पत्नी अभिनेत्री अनुष्का शर्मा पाठिंबा देताना आपण पाहिले आहे. जेव्हा चेन्नई विरुद्ध बेंगलोर सामना असायचा तेव्हा या दोघी आपल्यापल्या संघाला पाठिंबा देत व एकमेकांविरुद्ध असत. पण तुम्हाला माहिती आहे का? साक्षी धोनी आणि अनुष्का शर्मा या बालपणीच्या मैत्रिणी आहेत. आणि अनेक दिवसांपर्यंत हे चक्क या दोघींना सुद्धा माहित नव्हतं. नेमका काय आहे प्रकार चला तर जाणून घेऊया…(Anushka Sharma And Sakshi Dhoni Childhood Friend)

चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीची पत्नी साक्षी धोनी आणि क्रिकेटर विराट कोहलीची पत्नी अभिनेत्री अनुष्का शर्मा या बालपणीच्या मैत्रिणी आहेत. खरं तर, दोघीही लहान असताना आसाममधील एका शाळेत एकत्र शिकल्या. यापूर्वी खुद्द साक्षी आणि अनुष्कालाही ही गोष्ट माहीत नव्हती. पण, एकेदिवशी दोघांमध्ये बोलणे झाले तेव्हा दोघेही एकमेकांना आधीच ओळखत असल्याचे समोर आले. मात्र, आम्‍ही तुम्‍हाला हे आत्ता यासाठी सांगत आहोत कारण या दोघींचा बालपणीचा एक फोटो सोशल मीडियावर सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. (Anushka Sharma And Sakshi Dhoni Childhood Friend)

अयोध्येत जन्मलेली अनुष्का आसाममध्ये कशी पोहोचली? (Anushka Sharma And Sakshi Dhoni Childhood Friend)

या फोटोमध्ये साक्षी धोनी आणि अनुष्का शर्मा एकत्र पोज देताना दिसत आहेत. अनुष्का शर्माचा जन्म अयोध्येत झाला. पण, त्या दिवसांमध्ये अनुष्काचे वडील निवृत्त कर्नल अजय कुमार शर्मा यांची पोस्टिंग आसाममध्ये होती. याच कारणामुळे धोनीची पत्नी साक्षीच्या सेंट मेरी स्कूलमध्ये अनुष्काचे अॅडमिशन करण्यात आले होते.

अशा प्रकारे साक्षी आणि धोनीची भेट झाली

एकीकडे शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर अनुष्का शर्माने आपले करिअर फिल्मी दुनियेत केले. दुसरीकडे साक्षी धोनीने हॉटेल मॅनेजमेंटचा अभ्यास सुरू केला. तुम्हाला माहित असेलच, हॉटेलमध्ये नोकरीदरम्यान साक्षीची महेंद्रसिंग धोनीशी भेट झाली होती. पहिल्या भेटीनंतर दोघांमध्ये मैत्री आणि नंतर प्रेम झाले. या सर्व घटना महेंद्र सिंह धोनीवर आलेल्या ‘एमएस धोनी द अनटोल्ड स्टोरी’ या चित्रपटात दाखविण्यात आल्या आहेत.

x

दुसरीकडे विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांचे २०१७ मध्ये लग्न झाले होते. तसेच साक्षी आणि धोनी २०१० मध्ये लग्नाच्या बंधनात अडकले होते.

आयपीएलचा १६ वा हंगाम संपला आहे. महेंद्र सिंह धोनीच्या नेतृत्त्वाखाली चेन्नई सुपर किंग्जने पाचव्यांदा आयपीएलचा टायटल पटकावला आहे. मुंबईच्या रोहित शर्मानंतर अशी कामगिरी करणारा धोनी हा दुसरा कर्णधार ठरला आहे.

अधिक वाचा :

Back to top button