Heat affect diabetics: उष्णतेच्या लाटेत मधुमेहाच्या रुग्णांनी अशी घ्यावी काळजी; IMD ची माहिती

मधुमेह
मधुमेह
Published on: 
Updated on: 

पुढारी ऑनलाईन: जगभरात तापमानाचा पारा सतत वाढत चालला आहे. त्यामुळे उष्णतेच्या लाटा देखील अधिक तीव्रतेने जाणवत आहेत. या उष्णतेचा सामना करणे जगभरातील लोकांसाठीच आव्हानात्मक बनत चालले आहे. दरम्यान, भारतीय हवामान वेधशाळेकडून (IMD) उष्णतेच्या तीव्र लाटेचा मानवी आरोग्यावर होणाऱ्या परिणामाविषयी काही सूचना (Heat affect diabetics) देण्यात आल्या आहेत. यामध्ये प्रामुख्याने वाढत्या उष्णतेचा मधुमेह असणाऱ्या व्यक्तींच्या आरोग्यावर या काय परिणाम होतो आणि यावर कशाप्रकारे उपाययोजना करणे आवश्यक आहे, यासंदर्भात देखील भारतीय हवामान वेधशाळेकडून (IMD)   सांगण्यात आले आहे.

याविषयी माहिती देताना वेधशाळेने म्हटले आहे की, मधुमेह असणाऱ्यांना या आजाराचे व्यवस्थापन करणे ही आधीच एक तारेवरची कसरत असते; पण जेव्हा हवामानात उष्णता मोठ्या प्रमाणात वाढते तेव्हा मधुमेह असणाऱ्यांनी आपले आरोग्य जपण्यासाठी स्वत:हून काही पावले उचलणे अधिकच गरजेचे आहे. (Heat affect diabetics)

Heat affect diabetics: २४ पैकी किमान १७ तास ग्लुकोज प्रमाण पातळी स्थिर

मधुमेह असलेल्या व्यक्तींनी बदलते हवामान आणि त्याच्या परिणामांविषयी जागरूक असले पाहिजे. मधुमेह असलेल्या व्यक्तींसाठी, रक्तातील साखरेच्या पातळीवर सतत देखरेख ठेवत राहणे महत्त्वाचे असते. त्यामुळे बदलत्या हवामानात शरीरातील ग्लुकोजच्या पातळीवर सतत लक्ष ठेवले पाहिजे. विशेषत: जीवनशैलीतील बदलांमुळे शरीरातील ग्लुकोजची पातळी सतत वरखाली होत असेल तर त्याबाबत अधिकच दक्ष राहिले पाहिजे. शरीरीतील ग्लुकोज पातळी मोजण्यासाठी तुम्ही FreeStyle Libre सारख्या CGM उपकरणाचा देखील वापर करू शकता. जे अगदी प्रवासातही तुम्ही सहज वापरू शकता. यातून समोर आलेल्या आकड्यांवर लक्ष ठेवले पाहिजे आणि दररोज दिवसाच्या २४ तासांपैकी किमान १७ तास तरी शरीरातील ग्लुकोजची प्रमाण पातळी स्थिर असणे गरजेचे आहे.

रक्तातील ग्लुकोजची पातळी अनियंत्रित झाल्यास डिहायड्रेशनचा धोका

नानावटी मॅक्स सुपर स्पेश्यालिटी हॉस्पिटल, मुंबई येथील सीनिअर कन्सल्टन्ट एंडोक्रिनोलॉजिस्ट डॉ. गिरीश परमार सांगतात, "एक आरोग्यपूर्ण दिनचर्या ही मधुमेहाच्या व्यवस्थापनाची गुरुकिल्ली आहे. उन्हाळ्याच्या महिन्यांमध्ये आपले दैनंदिन वेळापत्रक पार कोलमडून जाऊ शकते. परिणामी लोकांना त्यांचे मधुमेह-स्नेही डाएट जपता येत नाही किंवा ग्लुकोजची पातळी वेळच्यावेळी तपासता येत नाही. जेव्हा उष्णतेची लाट असते तेव्हा मधुमेह असलेल्या व्यक्तींना डिहायड्रेशन म्हणजे शरीरातील आर्द्रतेचे प्रमाण कमी होण्याची अधिक शक्यता असते. रक्तातील ग्लुकोजची पातळी अनियंत्रित झाल्यास डिहायड्रेशनचा धोका आणखीनच वाढतो. त्यामुळे उष्णता वाढल्यास कन्टिन्यूअस ग्लुकोज मॉनिटरिंगसह (CGM) काही इतर उपाययोजना देखील करणे गरजेचे असते.

उष्णतेच्या लाटेत मधुमेहाचे व्यवस्थापन करण्यासाठी करा हे पाच उपाय

१. भरपूर द्रवपदार्थ घ्या: प्रवास आणि घराबाहेर जास्त वेळ काढणे म्हणजे डिहायड्रेशनला निमंत्रणच. हे टाळण्यासाठी तुम्हाला तहान लागली नसेल तरीही भरपूर पाणी, ताज्या फळांचा रस आणि कॅफिनमुक्त पेयांचे सेवन करा. तुम्ही शहाळ्याचे पाणी, शुगर-फ्री लेमनटी, लस्सी आणि अशी कितीतरी पेये घेऊ शकता. अशा वातावरणात अल्कोहोल आणि कॅफिनचे सेवन मात्र कटाक्षाने टाळा.

२. कडक उन्हापासून दूर रहा: उन्हाळ्यामध्ये लोकांना कधी एकदा सहलीला जातो, मैदानात मित्रमंडळींसोबत सायकल चालवायला जातो, असे होऊन जाते. मधुमेह असलेल्या व्यक्ती मात्र खूप वेळ उन्हात राहिल्यास त्यांना उष्णतेमुळे थकवा येण्याचा धोका अधिक असतो. या दिवसात गरगरल्यासारखे वाटणे, घाम येणे, स्नायूंमध्ये पेटके येणे, चक्कर येणे, डोकेदुखी, हृदयाची धडधड वाढणे आणि मळमळणे यांसारख्या लक्षणांकडे लक्ष ठेवा. तुम्हाला यातली कोणतीही लक्षणे जाणवल्यास थंड ठिकाणी जा आणि द्रवपदार्थांचे सेवन करा.

३. व्यायामाचे नियोजन हुशारीने करा : आराम हा उन्हाळा सुखात घालवायचा मंत्र आहे हे खरे, पण मधुमेहाचे व्यवस्थापन करण्यासाठी व्यायामही तितकाच महत्त्वाचा आहे. तुम्ही पहाटे लवकर किंवा संध्याकाळी उशीरा घराबाहेरचे वर्कआऊट करू शकता. पण जेव्हा उन्हाचा पारा चढलेला असेल तेव्हा घरातल्या घरात व्यायाम करणे किंवा योगासने करणेच योग्य राहील.

४. योग्य आहार घ्या : इतरांकडे पाहुणे म्हणून जाताना, तिथले स्ट्रीट फूड किंवा स्थानिक पदार्थ चाखून पाहण्याचा मोह होतो. सुट्टीमध्ये लोकांना नवीन रेस्टॉरंट्समध्ये जावेसे वाटते किंवा वेगवेगळ्या पाकसंस्कृतींमधले पदार्थ खावेसे वाटतात. पण हे कटाक्षाने टाळून मधुमेह असलेल्या व्यक्तींनी संतुलित आणि सकस आहारपद्धतीचे पालन करावे. शरीरातील ग्लुकोजची पातळी बिघडवतील असे पदार्थ खाण्याचा मोह टाळला पाहिजे.या काही सूचनांचे पालन करून, आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेऊन आणि मधुमेह व्यवस्थापनाची एक सर्वसमावेशक पद्धत अंगिकारून तुम्ही तीव्र उन्हाळ्यात देखील फीट राहू शकता.

५. अन् आनंद घ्या: उन्हाळ्याची सुट्टी म्हणजे विश्रांती आणि दिलखुलास वागण्याचे दुसरे नाव. परंतु मधुमेहामुळे असे करणे कठीण जाऊ शकते हे खरे आहे. पण जीवनशैलीशी निगडित या आजाराचे व्यवस्थापन करण्यासाठीच्या छोट्या-छोट्या उपाययोजना करून या हवामान बदलाचा देखील तुम्ही मनमुराद आनंद घेऊ शकता.

हेही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news