Sourav Ganguly Biopic : सौरव गांगुलीच्या बायोपिकमध्ये आयुष्मान खुराना? | पुढारी

Sourav Ganguly Biopic : सौरव गांगुलीच्या बायोपिकमध्ये आयुष्मान खुराना?

पुढारी ऑनलाईन डेस्क : क्रिकेटपटू सौरव गांगुलीच्या जीवनावर बायोपिक ( Sourav Ganguly Biopic ) येणार असल्याची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून आहे. आता एक नव्याने माहिती समोर आली आहे. या बायोपिकमध्ये सौरव गांगुलीची मुख्य भूमिका बॉलिवूड अभिनेता आयुष्मान खुराना साकारणार आहे. तर साऊथ स्टार रजनीकांत यांची मुलगी ऐश्वर्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळणार असल्याची माहिती मिळतेय.

एका रिपोर्टच्या माहितीनुसार, ‘लव्ह फिल्म्स’ चित्रपटाच्या निर्मितीपासून बॉलिवूड अभिनेता आयुष्मान खुरानाशी ( Sourav Ganguly Biopic ) या चित्रपटाविषयी बोलणी सुरू केली आहे. मेकर्स अनेक महिन्यांपासून आयुष्मानसोबत या चित्रपटाची चर्चा करत आहेत. चर्चा आता चांगल्या टप्प्यावर पोहोचली असून अधिकृतपणे घोषणा करणे बाकी आहे. स्वाक्षरी करण्यापूर्वी काही औपचारिकता पूर्ण कराव्या लागणार आहेत. सौरव गांगुलीच्या भूमिकेसाठी डावखुरा फलंदाज असलेला आयुष्मान हाच सर्वोत्तम पर्याय असल्याची त्याला खात्री निर्मात्यांना झाली आहे.

आयुष्मानने या बायोपिकसाठी कास्टिंगला मान्यता दिली आहे. आणि लवकरच त्याला वैयक्तिकरित्या निर्माते भेटणार आहेत. शूटिंग सुरू करण्यापूर्वी आयुष्मानला क्रिकेटचे प्रशिक्षणही घ्यावे लागेल असे निर्मात्याचे म्हणणे आहे. दुसरीकडे या बायोपिकच्या दिग्दर्शनाची धुरा रजनीकांत यांची मुलगी ऐश्वर्या सांभाळणार आहे.

वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाल्यास आयुष्मान लवकरच अनन्या पांडे, परेश रावल, अन्नू कपूर, राजपाल यादव, मनोज जोशी, असरानी, ​​अभिषेक बॅनर्जी, सीमा पाहवा आणि मनजोत सिंग यांच्यासोबतच्या ‘ड्रीम गर्ल २’ मध्ये दिसणार आहे.

हेही वाचा :

Back to top button