IIFA 2023 r madhavn
IIFA 2023 r madhavn

IIFA 2023 : आर माधवनला रॉकेट्री: द नंबी इफेक्टसाठी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार

Published on

पुढारी ऑनलाईन डेस्क : अभिनेता आणि दिग्दर्शक आर माधवनने आयफा २०२३ ( IIFA 2023 ) मध्ये रॉकेट्री: द नंबी इफेक्टसाठी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार पटकावला आहे.

अभिनयाची उत्तम जाण आणि दिग्दर्शनाची पारख असलेला आर माधवनने IIFA 2023 मध्ये रॉकेट्रीसह त्याच्या उत्कृष्ट दिग्दर्शनाच्या पदार्पणासाठी प्रतिष्ठित 'सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक' चा पुरस्कार पटकावला. उल्लेखनीय अभिनय कौशल्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या माधवनने आता दिग्दर्शनात देखील आपली कमाल दाखवली आहे. यामुळे त्याला हा खास पुरस्काराने गौरविण्यात आलं आहे.

IIFA 2023 r madhavn
IIFA 2023 r madhavn

रॉकेट्री हा चित्रपट भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) मधील माजी शास्त्रज्ञ नंबी नारायणन यांच्या जीवनावर आधारित बायपोक असून माधवनने यात उत्तम अभिनय केला आहे. त्यांनी केवळ चित्रपटाचे दिग्दर्शनच केले नाही तर नारायणन यांची प्रमुख भूमिकाही साकारली आहे. तसेच कलाकार म्हणून त्याने अभिनायची जादू यातून दाखवली आहे.

आयफामध्ये सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार मिळणं हे आर माधवन याच्यासाठी नक्कीच अभिमानास्पद आहे असे बोलले जात आहे. या चित्रपटाचं चाहत्यांकडून भरभरून कौतुक केले गेलं आहे.

हेही वाचा : 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news